अकोला- म्हैसांग येथील सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचा उद्घाटन समारंभ अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्री. संतोषदादा कोरपे यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.यावेळी डॉ श्री.सुभाषचंद्र कोरपे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शिरिषजी धोत्रे,माजी उपसभापती श्री निळकंठराव खेडकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आणि सेवांमध्ये सुलभता येण्यासाठी सर्व व्यापारी एका संकुलामध्ये येणे आवश्यक होते.त्यासाठी सेवा सहकारी संस्थेने केलेली व्यापारी संकुलाची निर्मिती हे विकास प्रक्रियेतील महत्वाचे पाऊल ठरल्याचे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ.संतोषदादा कोरपे यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ.सुभाषचंद्र कोरपे,शिरिषजी धोत्रे व निळकंठराव खेडकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी सर्वप्रथम म्हैसांग सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांतजी इंगोले,उपाध्यक्ष सुनीलजी देशमुख व संचालकांनी उपस्थित अतिथींचे स्वागत केले. सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व संचालकांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या व्यापारी संकुलाच्या निर्मितीमधील सहयोगाबध्दल अध्यक्ष इंगोले यांनी सर्व संचालकांना धन्यवाद देऊन उपस्थित अतिथींचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सेवा सहकारी सोसायटीचे संचालक लोचन कोरपे,ज्ञानेश्वर गावंडे,अजय लव्हाळे, राजेश मावळे,दत्तू नेवलकार, विकास राठोड,गजानन गवई,नितीन गावंडे, गणेश पाचपवार, श्रीमती लिलाबाई पिंपरे, सौ.स्मिता देशमुख, सचिव रविन्द्र झटाले व गावातील प्रतिष्ठीत मंडळी आणि शेतकरी सभासद तथा गावकरी उपस्थित होते. आभारप्रदर्शन अध्यक्ष श्रीकांत इंगोले यांनी केले.