अकोला. :–
“देव, धर्म व देश यांचे बळकटीकरण ही काळाची गरज असून त्यासाठी लहान वयातच मूल्यांची पेरणी होणे अत्यावश्यक आहे. यासाठी बालसंस्कार शिबिरे ही उपयुक्त ठरतात,” असे प्रतिपादन मा.आमदार वसंतराव खोटरे यांनी येथे केले. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट यांच्या वतीने आयोजित सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे मोठ्या उत्साहात व भव्यतेने पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले महाराज होते. उद्घाटक म्हणून मा .आमदार वसंतराव खोटरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल माळवे, तहसीलदार अनिकेत पुंडकर, डॉ. दिलीपराव काळे प्रा. प्रभाकर ठाकरे संत गाडगेबाबा अध्यासन प्रमुख, अमरावती विद्यापीठ, गजानन हरणे, समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास,ह.भ.प. श्रीधर महाराज पातोंड, प्रा. प्रल्हादराव तराळे, सुनंदा आमले, ह.भ.प. ज्ञानेशप्रसाद सावरकर, लता चिकटे, मधुसूदन गावंडे, डॉ. संदीप सोनखासकर, प्रदीप चोरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत वासुदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवरांनी शिबिराच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकत मार्गदर्शनपर भाषणे केली.
या शिबिरात नैतिक मूल्य शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व, संस्कार वर्ग, योग, ध्यान अशा उपक्रमांचा समावेश असून एक महिन्याच्या कालावधीसाठी २५० विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे व अध्यात्मिक वाचनातून जीवनमूल्यांची जाणीव करून देणे, हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.
शिबिराचे आयोजन संस्थेचे विश्वस्त अवी गावंडे, माधवराव ठाकरे, अशोकराव पाचडे, गजाननराव दुधाळ, अनिल कोरपे, शिबिरप्रमुख अंबादास मानकर, प्रा. साहेबराव मंगळे, नंदकिशोर झांमरे, बाळकृष्ण वाकोडे आदींच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश मोहकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन नंदकिशोर हिंगणकर यांनी मानले.
या उपक्रमाची महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बालसंस्कार शिबिरांपैकी एक म्हणून नोंद झाली आहे. पालक, नागरिक आणि भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचे महत्त्व
आपल्या प्रतिक्रिया द्या....