अकोला-- शासन खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे म्हणून आरडाओरड होते. परंतू या धोरणाने फक्त सध्याच्या शासकीय सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावणारांनाच वेदना होणार आहेत. ईतर शासकिय कर्मचारी,अधिकारी गलेलठ्ठ पगार आणि सोयीसुविधांचा उपयोग घेऊन सेवाकर्तव्याशी सतत प्रतारणा करीत असल्याचे चित्र शासकीय कार्यालयातून नेहमीच पहावयास मिळते.याचा ज्वलंत प्रत्यय तब्बल आठवड्यांची सुट्टी मारणाऱ्या भरपूर आर्थिक लाभ घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून सध्या येत आहे.
औषधी विक्रेते आणि बाजारपेठांचा बेकायदेशीर उद्योगांकडे सतत दुर्लक्ष करून सामाजिक स्वास्थ संकटात आणणाऱ्या या कार्यालयाने तब्बल आठवड्यांची सुट्टी मारल्याचे अंदाज समोर आले आहेत. सध्याच्या सुट्या असलेल्या आणि नसलेल्या या आठवड्यातील सर्व दिवसांना त्यांनी एका रेषेत सरळ नजरेसमोर ठेऊन आठवडाभराची दांडी मारल्याने संपूर्ण कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शींनी फोटोंसह स्पष्ट केले आहे.
सामाजिक स्वास्थाला सुरक्षित ठेवण्यासाठी एक नियंत्रक व्यवस्था म्हणून अन्न व औषध प्रशासन खात्याकडे पाहिले जाते.परंतू ही कर्तव्ये ही मंडळी कशा पध्दतीने आणि किती प्रामाणिकपणे पार पाडत असतात हे नागरीकांना चांगल्या प्रकारे माहिती असते.मागील आठवड्यात शनिवार आणि रविवारी सुटी होती.ती आनंदाने उपभोगत काल बुधवारच्या दिवशी सुध्दा या कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित नव्हते.त्यामुळे येणाऱ्या नागरीकांना "आम्ही आलो होतो म्हणून तुमच्या साहेबांना सांगावं" असे स्मशानावत शांततेत स्थानापन्न असलेल्या सर्वच रिकाम्या खुर्च्यांना सांगत त्यांचे निरोप घेत कार्यालयातून परतावं लागलं.त्यामुळे आता २८ व २९ आणि त्यानंतर रविवार व दोन आक्टोंबरची सुटी आहे. त्यामुळे अशी शासकीय पगार घेत मज्जाच मज्जा करणारे कर्मचारी आता मंगळवारी ३ आक्टोंबरलाच आपल्या खुर्च्यांवर परतणार ही शोकांतिकादर्शक वास्तव माहिती कुणी देण्याची आवश्यकताच नाही.
अशीच परिस्थिती अनेक शासकीय कार्यालयात असते.त्यामुळे रक्ताचे पाणी करत राब राब राबणाऱ्या श्रमिक आणि खाजगी क्षेत्रातील नोकरदारांपेक्षा किती तरी पटीने नशीबवान सध्या हिच मंडळी आहे.याबध्दल काहीच वैषम्य वन वाटून न घेणाऱ्याया मंडळीकडून ही शासन आणि जनतेची गैरसोईसोबतच सुरू असलेली सततची फसवणूक आहे.शासनाचा पगार घेऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांची दखल कधी घेतली जाणार अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त होत आहेत.