मानोरा : तालुक्यातील बोरव्हा फाटा कार्ली ते नांदगव्हाण पर्यंत ५ किलो मीटर रस्ता व डांबरीकरण काम शासनाच्या अंदाजपत्रकाला डावलून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. रस्ता कामात झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधित दोषी उपअभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदारांनी केलेल्या कामाची निःपक्षपातीपणे चौकशी करून कार्यवाही करावी, या मागणीसाठी महात्मा गांधी जयंती दिन २ ऑक्टोबरपासून तहसिल कार्यालयावर आमरण उपोषण तक्राराकर्ता युवराज रंगराव राठोड यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत आकांक्षीत जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मौजे बोरव्हा फाटा - कार्ली कुऱ्हाड ते नांदगाव पर्यंत ५ किलोमीटर रस्त्याचे व डांबरीकरणाचे काम
६ महिन्यापूर्वी अंदाजपत्रक फलक दर्शनीय भागात न लावताच थातूरमातूर काम करण्यात आले आहे. सदरील काम पुसद येथील चिद्दरवार गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व शाखा अभियंता यांना हाताशी धरून ५ किलोमीटर रस्ता व डांबरीकरणाचे काम शासनाच्या अंदाजपत्रकाला बगल देवून निकृष्ठ दर्जाचे केले आहे. तसेच रस्त्यावर अल्प डांबर वापरण्यात आलेला आहे. येत्या काही महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहे.
शासनाच्या नियमाला बगल देवून करण्यात आलेल्या रस्ता व डांबरीकरण कामाची चौकशी गुणनियंत्रण विभाग मार्फत करण्यात यावी. तसेच कमिशन कमावण्याच्या नादात कंत्राटदार यांच्याशी संगनमत करून दर्जाचे कोटी रुपयाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदार यांनी केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून कार्यवाही करावी आणि सबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या एजन्सीला काळया यादीत समावेश करावा. या मागणीसाठी गांधी जयंतीपासून युवराज राठोड यांनी आमरण उपोषणाला तहसिल कचेरीवर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
बॉक्स :-
गांधी जयंतीदिनी बोरव्हा ( फाटा ) कार्ली - कुऱ्हाड ते नांदगाव रस्ता कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून उपअभियंता, शाखा अभियंता व कंत्राटदार यांच्या विरुध्द कार्यवाही करावी, या संदर्भात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला १ ल्या दिवशी नायब तहसीलदार मधुकर अष्टुरे, बोरव्हा ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच राजेश राठोड, माजी सरपंच शंकर राठोड, पृथ्वीराज राठोड आदींनी भेट दिली.