शिरपुटी येथील प्रतिष्ठीत नागरीक तथा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशीक येथील महाविद्यालयात कार्यरत डाॅ.प्रा.दयाराम पवार यांच्या सुविध पत्नी डाॅ.रुपाली पवार ह्याचे दुर्धर आजाराने वयाच्या ४२ वर्षी निधन झाले.डाॅ रुपाली पवार ह्या उच्च शिक्षीत असून त्यांनी एम.ए.( इंग्रजी) बि.एड तथा संशोधन करुन आचार्य पदवी मिळवली होती.
त्या कारखेडा येथील तत्कालीन जनपथ जिल्हाध्यक्ष तथा पंचक्रोशीतील प्रसिध्द व्यक्तीमत्व स्व.देवला नाईक यांची नात तर फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे से.नि.प्रबंधक स्व.एल.डी.राठोड यांच्या कन्या होत.तर मिराभायंदर महापालीकेतील अनिल राठोड,मुंबई महापालीकेतील सुनिल राठोड,प्रमोद राठोड,अतुल राठोड यांच्या भगीणी होत.त्या सुस्वभावी असल्याने त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्युनंतर त्यांच्या पाठीमागे पती,सासू,सासरे,दिर,असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांचे उत्तरकार्य दि.२९/०६/२०१५ रोजी त्यांचे राहते घरी शिरपुटी ता.जि.वाशीम येथे ठरविले आहे.
त्यांच्या आत्मास शांती मिळो ही भावपूर्ण श्रध्दांजली.आणि अतिव दु:ख सहन करण्याची शक्ती पवार परिवारास मिळो.ही संत सेवालाल महाराज चरणी प्रार्थना असल्याचे
शोकाकुल- रितेश हरीष पवार
वसंतविचारधारा मंच महाराष्ट्र आणि कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे संस्थापक सचिव संजय कडोळे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहतांना म्हटले आहे.