अकोला :स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी संपूर्ण भारतभर कार्य केले जात आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल संपूर्ण भारतातील सामाजिक संस्था घेत आहेत. *अकोल्यातील जे सी आय न्यू प्रियदर्शनी तर्फे दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ.विशाल कोरडे यांच्या दिव्यांग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला* . माहेश्वरी भवन येथे आयोजित या कार्यक्रमात एम.स्क्वेअरचे मयंक थानवी,सुधीर खंडेलवाल,आरती पनपालीया, शारदा लखोटिया,सिंधू पवार,स्वाती राठी, मीना टावरी, मोनिका राठी, प्रेरणा चांडक व डॉ.विशाल कोरडे यांची मंचावर उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात आपण सहकार्य करणार असल्याचे घोषित केले . आरती पनपालिया यांनी जे सी आय तर्फे दिव्यांग सोशल फाउंडेशन व डॉ.विशाल कोरडे करीत असणाऱ्या कार्यात आम्ही नेहमी सहभाग नोंदवू असे आश्वासन दिले . समाजातील विविध सामाजिक संस्था व महिला मंडळाने दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून समाजसेवा करावी असे मत डॉ.विशाल कोरडे यांनी व्यक्त केले . ज्या *दिव्यांगांना रोजगार आणि उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सदस्य अस्मिता मिश्रा यांनी केले* . या सत्कार समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी कविता ढोरे, विद्या सुरवाड़े ,आरती जाजू , स्नेहा राठी, अनामिका देशपांडे, तन्वी दळवे, अनुराधा साठे, भावना कारीया, निता वायकोळे व जे.सी.आयच्या सदस्यांनी सहकार्य केले .