दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा भु- वैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी, सत्संग भवन येथे आज १३ जुलै २०२२ रोज संचालक श्री सुबोध दादा यांचे मार्गदर्शन मध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला.
११ वा सर्व गुरुदेव भक्तांच्या भोजन नंतर कार्यक्रम सुरू झाली. रामधून द्वारे गुरुपद गुंफा , कर्मयोगी संत पू तुकाराम दादांची महासमाधीचे पूजन करून गंभीर भजन द्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नांदेड मराठवाडा इत्यादी भागातील शेकडो गुरुदेव भक्त सहभागी झाले होते.
सर्व गुरुदेव भक्तांनी अड्याळ टेकडी येथील रचनात्मक व संघर्षात्मक कार्यासाठी सदैव तन, मन, धनाने, वस्तू वेळ व श्रमदान रुपात सहकार्य करण्याचे संकल्प केले.
कार्यक्रमाला भाऊराव बावणे, उत्तमरावजी पोहाणे, पुंडलिकजी रोडे, तलमले महाराज नान्होरी, शारदा रोडे काकू, परमेश्वरजी अक्कलवाड, लालचंदजी नखाते इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रम नंतर कर्मयोगी पू. तुकाराम दादा गीताचार्य यांना - कर्म हिच पूजा मोठी , याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यात्मक गुरुदक्षिणा देण्यासाठी सर्वांनी सर्वे न १९ गटातील शेतीवर सामूहिक पद्धतीने पारे मारणे आणि धुऱ्यावर तीळ तुरी पेरणीचे कार्य करून ५० वर्षापासूनच्या पारंपरिक शेतीच्या हंगामाला सुरुवात केली. यावर्षी सर्व गावातील भक्तांनी मोठ्या संख्येने पुढील रोवणा पेरणी साठी श्रमदान साठी येण्याचे संकल्प केले. या कार्यक्रम साठी दरवर्षी श्रीमती उषाताई किणगे, बेंगलोर यांच्यातर्फे अन्नदान करण्याचा संकल्प केला गेला आणि या कार्यक्रम पासून त्या अन्नदानाचा श्री गणेशाय करण्यात आला. शेवटी सुबोध दादा यांच्या सविस्तर मार्गदर्शनात स्थूल देह म्हणजे गुरु नसून त्यांच्यातील प्रगट झालेले ब्रम्हज्ञान, तत्त्वज्ञान म्हणजे गुरु होय असे सांगून शांती पाठ व जय घोष घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.