पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बोथली येथील युवक रामेश्वर बुधराम मडावी (४५) याचा मृतदेह गावातील विहिरीतील पाण्यात तरंगताना मिळून आला. रामेश्वर मडावी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. घरच्यांनी शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अशातच १७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता दरम्यान घराजवळील सार्वजनिक विहिरीतील पाण्यात त्याचा मृतदेह मिळून आला. विलास चिंधू टेकाम (३५, रा. बोथली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.