दिनांक 7 मे 24 रोजी उदापूर येथील महानंदा भानारकर या विधवा महिलेचे पूर्ण कुटुंब चौगान येथे लग्न कार्य साठी गेले असता दुपारी 12 चे दरम्यान त्यांचे घराला आग लागल्याची माहिती उदापूर येथील नागरिकांनी दिली .तेव्हा भानारकर कुटुंब परत आले तो पर्यंत गावकरी बांधवांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आली. परंतु सर्व जीवनास उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.यामुळे महानंदा भानारकर फार मोठे नुकसान झाले असून पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे .त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ मदत मिळावी म्हणून भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रा प्रकाश बगमारे यांनी मा माननीय पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे स्वीय सचिव सुधीरजी इंगोले यांना या घटनेची माहिती देऊन त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला यासोबतच माननीय तहसीलदार उषाताई चौधरी मॅडम यांना सुद्धा फोनवरून संपर्क साधून पीडित भानारकर कुटुंबाला शक्य तितक्या लवकर शासकीय मदत मिळावी व त्यांना त्वरित मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करावे अशी मागणी सुद्धा या भेटी प्रसंगी व्यक्त केली या प्रसंगी प्रा प्रकाशजी बगमारे यांच्यासोबत ओबीसी मोर्चा तालुका महामंत्री सुभाष नागतोडे , पत्रकार दिवाकर मंडपे , सौरभ खांदे, श्रीधर ठाकरे, ठेंगरी व अन्य गावकरी उपस्थित होते.झालेल्या दुर्घटनेबद्दल गावकरी दुःख व्यक्त करीत आहेत त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी विनंती करण्यात येत आहे