कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्यातील मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम- रुई (गोस्ता) या छोट्याशा खेडेगावात राहणारे, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त असलेले शेतकरी मित्र गोपाल विश्वनाथ गावंडे हे योग्य हवामान अंदाज वर्तविणारे हवामान अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला चिरपरिचित आहेत. पावसाळ्याचा अंदाज ते फार पूर्वीच वर्तवित असल्याने आणि साधारणतः त्यांचे अंदाज तंतोतंत खरे ठरल्याचा अनुभव आल्याने, राज्यातील ग्रामस्थ व शेतकरी त्यांच्या अंदाजाने सतर्क होऊन पुढील नियोजन ठरवीत असतात. त्यांनी आज दि. 24 जून 2024 रोजी,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचेशी फोनवरून वार्तालाप करतांना सांगीतले की,सध्या मोसमी वाऱ्याने आपल्या राज्यावर चांगली पकड धरल्याने, चालू आठवड्यात पूर्व पश्चिम विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. शिवाय वाशिम जिल्ह्यांसह कारंजा तालुक्यात आज दुपारी 04:00 वाजता ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होण्याचा 90% अंदाज वर्तवीला असून ढगाच्या गडगडाटासह विजा पडण्याची शक्यता आहे.तसेच परिसरातील नदी नाल्यांना पूर येण्याची देखील संभावना असल्याचे त्यांनी सांगीतले.त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दुपार नंतर शेतात थांबू नये.हिरव्या झाडाचा आसरा घेऊ नये.आपली गुरेढोरे - शेळ्यामेंढ्या झाडाखाली बसवू नये.पांदन रस्ते किंवा नदी नाल्यांना पूर असल्यास पुरामधून स्वतः जाऊ नये.तसेच आपली वाहने, बैलबंड्या,गुरेढोरे पाण्यातून बाहेर काढू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.