वाढत्या तापमानामुळे राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी गेला आहे. पाचोरा तालुक्यात एका शेतमजुराचा शेतात काम करताना मृत्यू झाला. प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग चव्हाण शेतमजूर शेतात काम करत होता.
उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि आप्तपरिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.