कारंजा(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : भारतीय लोकशाहीच्या 76 व्या स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी प्रमाणे,दि.15 ऑगष्ट रोजी सकाळी 09: 05 वाजता,कारंजा तालुक्यातील प्रमुख शासकिय ध्वजारोहण तथा ध्वजवंदनाचा कार्यक्रम कारंजा तहसिल कार्यालयाचे प्रांगणात पार पडला. यावेळी संपन्न झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा महसूलचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये तहसिलदार कुणालजी झाल्टे, निवासी नायब तहसिलदार विकास शिंदे, महसूलचे नायब तहसिलदार विनोद हरणे, निवडणूक नायब तहसिलदार लक्ष्मण बनसोडे,कारंजा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, दिनेशजी शुक्ला, कृषी अधिकारी, तलाठी अमोल वक्ते,धानोरकर इत्यादी हजर होते.सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन,व राष्ट्र गिताचे सामुहिक गायन करण्यात येऊन भारतमातेचा जयजयकार करण्यात आला.
ध्वजारोहण कार्यक्रमाला शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थीनी, प्रतिष्ठित मान्यवर, सर्वच राजकिय पक्ष व संस्थाचे प्रतिनिधी, माजी सैनिक,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती,पत्रकार मंडळी, विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या प्रसंगी कारंजा उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी कारंजेकर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या स्नेहमय शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल वरघट यांनी तर आभार प्रदर्शन विनोद हरणे यांनी केले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष,शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे.