वाशिम : "यंदा जनतेचा कौल नेमका कुणाला ?" "कोणत्या राजकिय पक्षासोबत सर्वसामान्य मतदार रहाणार ?" ह्याचा अंदाज जाणून घेण्याकरीता आमच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषद आणि साप्ताहिक करंजमहात्म्यने वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातील खेडोपाडी निरिक्षण केले असता आमच्या पाहणीत असे दिसून आले की, "लोकसभा निवडणूकीबाबत सर्वसामान्य मतदार असलेली जनता फारसी उत्सुक नाही. यातील बऱ्याच लोकांना तर खासदार म्हणजे काय ? त्याला कशासाठी निवडून द्यायचे ? निवडून दिल्यानंतर तो मतदारांकरीता कोणता विकास करणार ? त्याची जाणीवच नाही." अनेक मतदारांनी तर असे सांगितले की, "आम्ही केवळ मतदान करायचे म्हणून करतो." मात्र निवडणूकी नंतर निवडून आलेल्या खासदाराची आम्हाला ओळख नसते.किंवा खासदार आम्हाला कोणत्याही विकासकामा करीता अग्रेसर व आग्रही राहून लोकसभा मतदार संघामध्ये विकासात्मक कार्य करीत असल्याचे केव्हाच प्रत्यक्षात बघायला सुद्धा मिळत नाही.तसेच आमच्या लहान मोठ्या खेडेगावात किंवा आमच्या शहरात केव्हा खासदार आल्याचे ऐकिवात नाही किंवा आठवतही नाही.अथवा खासदारानी आमचे खेडेगावाला वा शहराला भेट दिल्याचे उदाहरणही दिसून येत नाही. त्यामुळे खासदाराची आम्हाला ओळखच नाही.आणि त्यामुळे खासदार निवडणूकीबाबत सर्वसामान्य मतदार उदासिन दिसून येत आहे. व हे वाशिम यवतमाळ मतदार संघातील कटूसत्य आहे.आज जर आपण बघीतले तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाशिम जिल्हा व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ आकांक्षीत किंवा मागासलेला मतदार संघ म्हणून ओळखल्या जात आहे.या मतदार संघातील पांढरे सोने असलेल्या कपाशीचे पिक दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे.कपाशीवर चालणारे जुने जीन,उद्योगधंदे,तेलघाण्या मोडकळीस आलेल्या आहेत.नविन औद्योगीक वसाहती आणि उद्योग कारखाने येथे सुरू करण्यात येत नाहीत.येथील कास्तकार "अस्मानी व सुलतानी" संकटाने बेजार होऊन कर्जबाजारी झालेला आहे.शेतकऱ्याच्या सोयाबीन,कपाशी पिकाला हमीभाव नाही.त्यामुळे या लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्याचे आत्महत्याचे प्रमाण सर्वाधीक आहे.मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा खासदार ह्या मतदार संघाला मिळत नाही.हे या लोकसभा मतदार संघाचे दुदैव आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर कामगाराच्या हाताला काम मिळून प्रपंच चालविण्या एवढाही रोजगार मिळत नाही. "खासदारकीचे उमेद्वार निवडणूकीच्या वेळी तर मिथ्या आश्वासन देऊन मोठमोठे वचननामे जाहीर करतात.मात्र निवडून आल्यानंतर त्यावर कोणतीच अंमलबजावणी होत नसल्याने येथील मतदार राजा लोकसभा निवडणूकीकरीता फारसा उत्सुक दिसत नाही. मतदार राजाच्या मनामध्ये महायुतीचा उमेद्वार असो.किंवा इंडिया आघाडीचा उमेद्वार असो. कोणत्याच उमेद्वाराविषयी आवड किंवा उत्सुकता दिसत नाही.हेच या मतदार संघातील सर्वसामान्य मतदाराची वास्तव परिस्थिती आहे.असे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.