कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : नुकतेच काही दिवसांपूर्वी कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणीसाहेब यांच्याकडून मतदारसंघातील कारंजा तालुका व मानोरा तालुका येथील सर्व शासकीय अधिकारी यांच्याकडून सध्य परिस्थिती मध्ये कारंजा उप विभागात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या जिवीत हानी, वित्तहानी ,विविध सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान इत्यादी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.मतदार संघात सुरू असलेल्या कामांचा, नव्याने प्रस्तावित केलेले कामांचा आढावा घेतला, पूर्ण झालेल्या कामांचा अपूर्ण कामांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. कारंजा तालुक्यातील व शहरातील शहरातील घरकुलांसाठी कर्मचारी कर्मचारी अधिकारी पैशाची मागणी करीत असल्यास त्यावर त्वरित कारवाई करून त्यास निलंबित करण्याची कारवाई करावी असे या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांसमक्ष निर्देश देत कारंजा नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कारंजा व मानोरा येथील गट विकास अधिकारी आणि तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणासाठी कोणी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश यावेळी विभागीय अधिकारी महसूल व तहसीलदार कारंजा मानोरा यांना दिले. तसेच याच बैठकीत त्यांनी आपले स्वीय सहाय्यक संजय भेंडे त्यांना आदेशित केले की, तुमचा नंबर ९७६७५४७६५५ जनतेसाठी बातमीत द्या व नागरिकांना सांगा की, कुणाची काही भ्रष्टाचार बाबत तक्रार असल्यास या नंबर वर मेसेज द्या. मी बाकी कार्यवाहीचे बघतो. या बैठकीत गट विकास अधिकारी यांच्याकडून घरकुल योजनेची स्थिती विचारली असता 129 प्रकरणात गावठाण जागा घ्यावयाची घेतली. जागा अलॉट करण्याचे आदेश दिलेत असे उपविभागीय अधिकारी वऱ्हडे यांनी सांगितले. मानोरा येथील 4 घरकुले तांत्रिक अडचणीने पेंडिंग असल्याचे सांगितले. इ क्लास जमिनीवरील अमेंडमेंट झाली नाही जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मिटींगला हा विषय घेण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी महसूल यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी महसूल यांनी सांगितले तसेच याबाबत शासनास मार्गदर्शन मागितल्याचे सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले. कारंजा मानोरा एम एस ई बी कार्यालयाचे अधिकारी यांना आमदार महोदय यांनी तालुक्यात मतदारसंघात पडलेले इलेक्ट्रिक पोल उचलून व्यवस्थित करण्यास पंधरा दिवसाची मुदत दिली असून न झाल्यास कार्यवाहीस तयार राहण्याचे सांगितले. कारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी सर्वे पासून वंचित राहू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असे यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी कृषी कार्यालयाचा आढावा घेताना सांगितले तसेच2 दिवसाच्या आत कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी देण्याचे बजावण्यात आले. तसेच एम एस ई बी कारंजा यांना सब स्टेशनचे नवीन प्रस्तावित केलेल्या सब स्टेशनची यादी त्यांच्याकडे त्वरित पाठवण्याचे सांगितले. फॉरेस्ट अधिकारी त्यांना सावरगाव येथील नाल्यामुळे जमीन खरडून गेली असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले येथील नाला रुंदीकरण करणे आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुद्धा अनेक बाबी बद्दल निर्देश देण्यात आले. कारंजा पोलीस इन्स्पेक्टर शुक्ला यांच्याशी गावातील सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. कामरगाव सब स्टेशन मधील मूर्तिजापूर येथील गावे कमी करून त्या बाबत प्रपोजल देण्याचे उपस्थित विज अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.मानोरा येथील पुलासंदर्भात नामदार गडकरी साहेब यांना पत्र देण्याचे स्वीय सहाय्यक सुभाष सुरोशे यांना सांगितले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना आमदार तर राजेंद्र पाटणी यांनी सांगितले की यावार्डी व मेहा येथील रस्ता ताबडतोब दुरुस्त करा. उपस्थित अधिकाऱ्यांनीलगेच दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिवण बु. येथे रस्त्याचे काम करण्यात आले ते अर्धवट असल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश येथील इंजिनियर कांबळे यांना देण्यात आले असुन आठ दिवसात काम पूर्ण करू असे अधिकाऱ्याने सांगितले. उपस्थित अधिकारी शेरवानी यांना काही कामाबद्दल निर्देश देण्यात आलेत तसेच बैठकीस उपस्थित विविध विभागाचे अधिकाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या कामांबद्दल सूचना सूचना देण्यात आल्यात . बैठकीत उपस्थित कारंजा शहराध्यक्ष ललित चांडक यांच्याशी बोलताना सांगितले की, गावातील हद्दक्षेत्रातील कामाकरिता आणखी 25 कोटी निधी उपलब्ध करून देऊ. उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे ,कुणाल झाल्टे तहसिलदार, कारंजा,राजेश वझीरे तहसिलदार, मानोरा विनोद हरणे नायब तहसिलदार, कारंजा जि.एम. राठोड नायब तहसिलदार, मानोरा, विकास शिंदे नायब तहसिलदार कारजा, के. व्हि. घुगे सहा गटविकास अधिकारी, कारंजा,डॉ. एम. एस. मेढे (प.वि.अ. (वि), एन. एस. लुगे सि.डी.पि.ओ,मोहन व्यवहारे सहा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास, अकोला, शशिकांत रा. ठाकुर उ. वि. अभियंता बिएसएनएल
श्री एम. जी. वाट सहा. आयुक्त, समाजकल्याण, वाशिम,
दिपक मोरे मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा / मानोरा,
श्री आर आर जठाडे तालुका कृषी अधिकारी, कारंजा,श्री तुषार जाधव EO. (S) ICDS, आर. डी. बिजवे जलसंधारण, जि.प. उपविभाग, एस. एस. फेरवाणी उप विभागीय अभियंता, जलसंधारण, कारंजा, पि. बी. खुजे उपविभागीय अभियंता लघुसिंचन, कारंजा, बाळासाहेब बायस गटविकास अधिकारी, मानोरा, ए. एस. शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.). कारंजा, जे. व्हि. जाधव वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.), मानोरा, डि.एच. राजपुत उपकार्यकारी अभियंता विज कंपनी कारंजा, पि.एस. खैरकार उपविभागीय अभियंता रा.म., यवतमाळ, बि पिल्माकोडे सहा अभियंता (श्रेणी-2), सा.बां. उपविभाग, मानोरा,श्री एम. एस. सुर्वे कनिष्ठ अभियंता, पं. स. मानोरा, माधव साखरे विस्तार अधिकारी (पंचायत) पं. स. कारंजा,श्री अशोकराव वाघमारे विस्तार अधिकारी (पंचायत) प. स. मानोरा इत्यादी सह अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, ठाकूरसिंग चव्हाण यांनी अनेक समस्या निदर्शनास आणून दिल्यात तत्क्षणी त्या सोडवण्याची निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....