सांस्कृतिक विभागाचे मानधन घेणाऱ्या,राज्यातील हजारो वृद्ध साहित्यीक लोककलाकार योजनेच्या जुन्या लाभार्थ्याचे आधारकार्डला मोबाईल क्रमांक अद्यावत (लिंक) नसल्यामुळे किंवा जुन्या जाणत्या गोरगरीब वयोवृद्ध लाभार्थ्याकडे स्वतःचे मोबाईलच नसल्यामुळे शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या महाकलासन्मान नोंदणी या संकेतस्थळावर त्यांच्या आधारकार्डाचे प्रमाणिकरण (ऑनलाईन नोंदणी) होऊ शकत नाही.व हे प्रमाणिकरण झाले नाही तर शासनाकडून वृद्ध लाभार्थ्यांना आजतागायत दरमहा नियमीतपणे दिले जाणारे मानधन चालू महिन्यापासूनच मे 2024 पासून अचानक रोखले जाणार आहे.किंवा कायमचे बंद केले जाणार आहे.परंतु शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचनालयाकडून लाभार्थ्याना यापूर्वी कोणतीही माहिती आणि कल्पना न देता अचानक दि 02 मे 2024 रोजी काढलेल्या पत्रकामुळे जुन्या जाणत्या हाडाच्या,दुर्धर आजार ग्रस्त किंवा वृद्धत्वाने जर्जर असलेल्या मानधन लाभार्थ्याना अचानक धक्काच बसला आहे. तरीही शासनाने वयोवृद्ध कलाकाराची मानसिक व शारीरिक लक्षात घेऊन,चालू महिन्या पासूनचे त्यांचे मानधन न रोखता,त्यांना आधारकार्डाला मोबाईल नंबर अद्यावत (लिंक) करण्यासाठी आणि सदर्हु महाकलासन्मान संकेतस्थळावर नोंदणी करण्याकरीता साधारणत : कमितकमी तिन महिन्याची मुदत किंवा कालावधी देण्यात यावा.अशी मागणी विदर्भ लोककला संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सांस्कृतिक मंत्री सुधिर मुनगंटीवार तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषणजी चवरे यांना पत्रकाद्वारे केली असून मानधन लाभार्थी साहित्यिक कलाकार यांचे मानधन बंद केल्यास शासनाबद्दल वयोवृद्ध कलाकारांमध्ये चुकीचा संदेश जाईल व असे झाल्यास साहित्यीक कलाकारांना विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा मार्फत येत्या दि 26 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे व्यापक धरणे आंदोलन करावे लागणार आहे व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.असा इशारा या निमित्ताने,विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.