कारंजा : कारंजा शहर सर्वधर्मिय तिर्थक्षेत्रांचे आणि शांती, सलोखा, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रिय एकात्मतेचे प्राचिन शहर म्हणून ओळखले जाते. अशा शहरातील माऊली संत श्री मुंगसाजी महाराजांच्या भाविक भक्त मंडळीने, अकरा वर्षापूर्वी एकत्र येऊन, हभप सुरेशभाऊ गढवाले यांच्या नेतृत्वात सुनिल गुंठेवार,भगवानदास खेमवानी , हभप संजय म.कडोळे, राजाभाऊ शेळके, सुनिल माकृवार, राम गटागट, शंकर संकेत, उमेश माहितकर, नगरसेवक नितीन गढवाले विजय खंडार, योगेश गढवाले, रूपेश गढवाले,इत्यादी एकूण सतरा - अठरा मंडळींनी एकत्र येत श्री माऊली सेवा समितीची स्थापना करून,श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंत पायी पायदळ चालत दिंडी पदयात्रा सुरु केलेली होती. दर वर्षी नविन वर्षाच्या प्रारंभी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात येणाऱ्या रविवारी या समिती द्वारे श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंत पदयात्रा काढण्याचे ठरविण्यात आले. दरवर्षी भाविक पुरुष व महिला वारकर्याची संख्या वाढतच गेली व वर्तमान वर्षात भाविकांची संख्या तिन हजार ते साडे तिन हजारावर जाऊन पोहोचली . हळूहळू कारंजा शहरातील भाविक भक्त त्यांच्या स्वेच्छेने चहापाणी, अल्पोपहाराची व्यवस्था करू लागले. तर मार्गात बोदेगाव येथील गोंधळी समाजाचे माऊली सेवाधारी गजाननराव सुपलकर यांचे कडून सर्व वारकरी भाविक भक्तांची भोजनाची व्यवस्था करण्यात येऊ लागली. रविवारी दि . १ जानेवारी २०२३ रोजी सुद्धा सकाळी ७ : ०० वाजता, दिंडीप्रमुख सुरेशभाऊ गढवाले यांच्या नेतृत्वात पहाडपुरा येथून सकाळी, बॅन्डबाजा, टाळ विणा मृदंगाच्या तालावर भजनी मंडळाच्या गजरात पदयात्रा प्रारंभ झाली. पदयात्रेच्या मार्गात नितीन रेवाळे, अमोल अघम, समिर देशपांडे, सुनिल माकृवार, हभप मधुकरराव मापारी तथा संत नामदेव महाराज मंदिर, अल्पबचत प्रतिनिधी सुरेश गढवाले, अमोल गढवाले, श्री एकविरा माता मित्र मंडळाचे बंटीभाऊ उर्फ सत्यजीत गाडगे, गजानन सुपलकर (गोंधळी) आदींनी वारकरी मंडळीचे चहापान, अल्पोपहार, भोजन वगैरे व्यवस्था केली. मार्गात येणाऱ्या प्रत्येक खेडेगावी ग्रामस्थांकडून माऊलीच्या पालखीचे हर्षोल्सात स्वागत करण्यात आले. श्रीक्षेत्र धामणगाव येथे माऊली दर्शन व महाआरतीने पदयात्रेची सांगता झाली . सदरहु पदयात्रेच्या लाईव्ह चित्रीकरणाची व्यवस्था महाराष्ट्र न्यूज 24 चे भाग्यश्री गणवीर - विनोद गणवीर यांनी केली होती . श्रीक्षेत्र धामणगाव येथून वारकऱ्यांना कारंजा येथे परत आणण्याकरीता भाविकांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली होती . असे वृत्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे संजय कडोळे यांनी कळविले आहे .