कारंजा : वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील स्थानिक विश्राम गृह कारंजा(लाड)येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या उपस्थितीत कारंजा (लाड)तसेच मानोरा येथील कार्यकारणी पुढीलप्रमाण घोषीत करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार संघटनेला मिळालेले वृत्त असे की, स्थानिक विश्रामगृह कारंजा येथे भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुकांत भुतेकर,युवा जिल्हाध्यक्ष सचिन काकडे , शेतकरी नेते गजानन आमदाबादकर, भूमिपुत्राचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लाडकर व मानोरा तालुका अध्यक्ष भूषण मुराळे, बंटी देशमुख, किशोर डहाके , विनोद ठाकरे ,विशाल अगमे , विलास मनोहर, अंकुश काळे , आकाश मोहकर हे उपस्थित होते. यावेळी शेतकरी कसा विवंचनेत आहे , शेतकऱ्याचे पीक विम्याचे अतिवृष्टीचे पैसे अद्याप पर्यंत आले नाही त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड)मानोरा मंगरूळ (पीर) रिसोड मालेगाव येथे झालेल्या चक्रीवादळ व गारपीटी मुळे कांदा हळद आंबा टरबूज खरबूज उन्हाळी भुईमुंग तीळ जव्हारी या पिकाचे पंचनामे करून शासनाने त्वरित मदत द्यावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याचा तोडगा शासनाने न काढल्यास वाशिम जिल्ह्यातून आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा बैठकी प्रसंगी देण्यातआला या कार्यक्रमाला नवनिर्वाचित उपाध्यक्ष आकाश मोहकर सचिव बंटी देशमुख सोशल मीडिया प्रमुख अंकुश काळे प्रवक्ता किशोर अगमे प्रसिद्धी प्रमुख विलास मनोहर ग्रामीण प्रवक्ता किशोर डहाके विनोद ठाकरे विशाल अग्मे संघटक रवी लाहे इत्यादी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाले असल्याचे त्यांनी सांगीतले .