वाशिम : दि.१६ सप्टेंबर रोजी चिंचोली येथील खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी दिग्रस तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची महत्वाची बैठक खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनात संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद यांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान आगामी सर्व निवडणुका जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा अधिकाधिक उंच फडकवायचा निर्धार केला. बैठकीला खासदार संजयभाऊ देखमुख यांनी शिवरायांच्या गनिमी काव्याने लढण्याचे, मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दिग्रस तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थितीत होते.