पळस फुलाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे.पळसाच्या फुलाला बंजारा भाषेत केसुला म्हणतात.बंजारा समाज हा उत्सव प्रिय समाज म्हणून ओळखला जातो, बंजारा समाजात होळी सण खुप महत्वाचा समजला जातो.होळी सणाची सुरुवात बंजारा समाजात एक महीण्या अगोदर होते.माघी पोर्णीमेला होळीचा दांडा गाडला जातो म्हणून माघी पौर्णिमेला दांडी पौर्णिमा (दांडी पुनम) देखील म्हटले जाते.त्या दिवसापासून होळी सणाला सुरुवात होते, आणि महीनाभर बंजारा समाजाच्या तांड्यात गाड्यांच्या तालावर होळी गित गायन करून नृत्य केले जाते अश्याप्रकारे होळी सणाची सुरुवात केली जाते.होळीच्या गितास लेंगी म्हटले जाते,तर नुत्यास लेंगी नुत्य म्हणतात.त्याचे अनेक प्रकार आहेत खडी लेंगी,बैठी लेंगी,दंडा जोडने केर. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला समाज बांधव होळीच्या सणाला तांडात हमखास येतो.महीनाभर चालणा-या होळी सणांच्या कालावधी मध्ये मुलगा झाल्यास त्यांची धूंड केली जाते.विवाह इच्छुक(उपवर) तरुण होळीचे पूजन करतो त्यास बंजारा भाषेत गेरीया म्हणतात. होळीचे दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अथवा सोईच्या दिवशी गेर करण्यात येतो यात बक-यांचा बळी होळीला दिला जातो. धुळवडीला पळसाच्या फुलांपासून बनविलेला केमिकल विरहीत रंग तयार करुन रंगपंचमी साजरी केली जाते.
मुंबई प्रदेशात मोठ्या प्रमाणात कनार्टक,तेलंगाना,महाराष्ट्रातील मराठवाडा,विदर्भ,खानदेश,प्रदेशातून स्थानांतरीत होऊन मुंबई स्थायीक झाला आहे.बंजारा समाजबांधव मासेमारी व्यवसायापासून बांधकाम कारागीर,छोट्या मोठ्या कार्यालयात शिपाई तसेच शासकीय निमशासकीय सेवेत उच्च पदस्थ तसेच मोठं मोठ्या कंपन्यात उच्च पदस्थ आहेत.
मुंबईत स्थायिक समाज बांधव होळी सण पारंपारिक पध्दतीने साजरा करत असतात यासाठी नवी मुंबईतील प्रसिध्द वास्तूविशारद मिलींद पवार पुढाकार घेऊन माघी पौर्णिमेला बेलापूर येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरा समोर दांडा गाडण्यात येऊन महीनाभर सण साजरा केला जात असतो. मुंबईत शिळफाटा,चांदिवली,आरे काॅलनीत संत सेवालाल महाराज यांचे मंदिर येथे देखील पारंपारीक पद्धतीने होळी सण साजरा केली जातो.वसई-विरार,मिरा भाईंदर,कल्याण ,टिटवाळा,बदलापूर,पातलीपाडा,कळंबोली,खारघर ,कामोठे तळोजा,पनवेल रहायची भागात हौशी तरुण मोठ्या प्रमाणात असल्याने ते होळी सणात रंगत आणत असतात.
पौष /माघ महिन्यात जसा पळस बहरतो तस तसी बंजारा तांड्यात होळीची गिते (लेंगी) बहरु लागते
चैत्र महिन्यात सारा वूक्ष फुलांनी बहरून जातो तसा तांडा देखिल लेंगीने आणि नुत्याने बहरून जाते.सा-या झाडावर फुले फुले दिसतात,जसा रंगाचा सरोवर पाहत आहोत त्या प्रमाणे तांडा देखील लेगिंने बहरून जातो.पळसाला इंग्रजीत फ्लेम ऑफ फाॅरेस्ट म्हणतात.पळस अनेक व्याधींवर रामबाण उपाय असल्याने पळसाला आयुवेर्दात देखील अतिशय महत्व आहे.
पळसाच्या लाकडात सुप्त अग्नी असतो.प्राचीन काळी, यज्ञासाठी यांचा उपयोग केला जात असे.पळस फुलला की गुलाबी रंगाच्या पळस मैनाननचे (रेजी पेस्टर)थवेच्या थवे पळसाच्या फुलातील मधासाठी जगभरातून भारतात येतात.अनेक पक्षी किटक ही भारतात येतात.फुलांनी बहरलेला वूक्ष मधमाश्यांच्या गुंजाराने निनादित होतो,जणू ते झाड गाणार झाड होतं निसर्ग साहीत्यीक मारूती चितमपल्ली यांनी आपल्या जंगलाचं देणं या पुस्तकात पळस फुलांचे सुंदर वर्णन केले आहे.
उष्ण कटिबंधांत येणा-या विदर्भात पानझडी वनात पळसाची झाडे विपुल प्रमाणात आढळतात मात्र कोकणाच्या जंगलात फारसी आढळत नाही.सिमिटाचे जंगल असलेल्या मुंबईत पळसाचे दर्शन होने मुस्कीलही नहीं तर नामुकीन आहे.माझी नोकरी मुंबईला तर राहणे नवी मुंबईला त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात पळस बहरतो परंतू मी राहत असलेल्या परिसरात पळसाची झाडेच नसल्याने मी बैचेन असायचो नवी मुंबई,पनवेल,खोपोली परिसरात सगळीकडे शोधाशोध करुण थकलो पण मला कुठेच पळसाचे झाड मिळाले नाही.
माझे सहकारी नामदेव भोईर,तुकाराम निपुर्ते यांच्या कडून मला माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यात पळसाची झाडे आहेत, पण कामातुन वेळ काढत शहापूर गाठून केसुलाचा आनंद घेणे दुरास्तच त्यामुळे माझी शोधाशोध काही थांबत नव्हती.अश्यातच लोधीवली येथे रस्त्याच्याकडे दोन,तिन झाडे शोधून काढली पण पळस बहरतो त्या हंगामात कामाचा व्याप जास्त असल्याने लोधीवलीला जायला देखील मिळत नव्हते म्हणून अधिकच बैचेन वाटायचे.
मुंबईत फिरत असतांना छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीक ए.के.नायक मार्गावर दोन झाडे पळसाचे दिसली तर भायखळ्यातील राणीच्या बागेत देखील दोन टोलेजंग पळसाचे झाड आहे तर कामोठे येथील उघणात एक छोटेसे रोपटे आहे. देखील माझी शोधाशोध कमी झाली नाही.लोकलने कामावरून परतत असतांना रेल्वे रूळाला लागून असलेल्या झाडांना निरखुन बघू लागलो एके दिवशी नवी मुंबईल्या मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या नजीक खाडीत एकमेकांच्या विरूध्द दिसला दोन मोठे वृक्ष पळसाची दिसली परंतू रस्ता नसल्याने सदर ठिकाणी पोहचायचे असल्यास रेल्वे रूळावरून जावे लागत असल्याने ते धोकादायक होते.
आज रविवार असल्याने सकाळी फिरावयास गेलो असता विचार केला की काही वेळाने रेल्वेचा मेगा ब्लाॅक असेल त्यामुळे रेल्वेची वाहतुक पुर्णत: बंद असेल म्हणून चालत तिथे पोहोचलो त्या ठिकाणी दोन पळसाचे मोठे वृक्ष होते एवढ्या मोठ्या वृक्षाला एकट, दूकट केसुला (फुले)लागलेली तसेच फुले गळत होती एखाद्याच फुलाला पळस पापडी(बिया) लागत होती.झाडा वाळवी लागलेली.या या झाडाच्या दोन छोटी,छोटी झाडे पळसाची होती परंतू त्या झाडांना देखील बहर आला नव्हता.एक कदाचित दमट वातावरण पळसाच्या झाडाला पोषक नसावे म्हणून जास्त फुले येत नसावी तसेच इतरत्र देखील दुसरे झाड उगवत नसावे.असो पण केसुला पाहून आनंद गगनात मावेनासा झाला आणि सेल्फीचा मोह आवरता आवरला नाही.
रितेश हरीष पवार मो.न.९६५३२३६६७१
वसंतविचारधारा मंच महाराष्ट्र.
आपल्या प्रतिक्रिया द्या....