अकोला - देशमुख महिला मंडळ अकोला जिल्हा च्या वतीने स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे नववर्षाच्या शुभपर्वावर संक्रांतिनीमीत्य हळदीकुंकू, स्नेहमीलन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देशमुख समाजाच्या असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत अतिशय हर्षोल्हासात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.विशाखा देशमुख,मुंबई ह्या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच अध्यक्ष स्थान महिला मंडळाच्या ज्येष्ट सल्लागार कविताताई ढोरे यांनी भूषविल त्यांच्या सह मंचावर मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कल्पना देशमुख, लताताई देशमुख यांची उपस्थिती लाभली.
शेला आणि फुलांचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत नीताताई पूजाताई ज्योतीताई कुटासकर प्रमिला वैशाली डॉ.अस्मिता यांनी केले.दीपप्रज्वलन आणि माँ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व कृषिरत्न भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.पार्वती ग्रुपमधील
प्राची देशमुखच्या गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू,तिळगुळवडी, ओटी आणि वाण देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये लताताई,शीतल,स्वप्नाली,
स्वप्ना,मंजू,प्रतिभा,अश्विनी, सवीताताई,कीरणताई,सुष्मा,उषाताई,वर्षा,जयाताई, साधनाताई, यांचा सहभाग होता आणि ही जबाबदारी एकवीरा ग्रूपच्य रेखा उज्वला मीना प्रवीणा अनिता सीमा सविता यांनी सांभाळली.
मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख यांनी आपल्या प्रस्ताविकातून मंडळाच्या कार्याबद्दल आणि महिला मंडळ राबवित असलेल्या विविध स्तुत्य उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.विशाखा देशमुख यांनी महिला मंडळाच्या कार्याची प्रशंसाकरीत महिलांच्या स्वास्थ्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
तर महिलामंडळाच्या ज्येष्ट सल्लागार कविताताई ढोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महिला मंडळाद्वारे आणखी नवनवीन उपक्रम राबविण्यात यावे यासंबंधी मार्गदर्शन करीत उत्कृष्ट माहिती दिली.
यावेळी महिलांकरीता करमणुक पर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चालता बोलता हा प्रश्नमंजुषा कार्यक्रम सोनल रेवती तवर आणि किरणताई यांनी घेतला सोबतच विजेत्यांना ताबडतोब बक्षिसे देखील देण्यात आलीत.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध गटाच्या महिलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.यामध्ये कॉमेडी नाटीका, समाजप्रबोधन पर नाट्य, कविता वाचन, फॅशन शो,गीत आणि नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये महालक्ष्मी ग्रुप च्या शिल्पा अनिता ममता स्वप्ना प्रांजली तृप्ती कल्पना वैशाली माया किरणताई शिल्पा सीमा तसेच गायत्री ग्रुपच्या वर्षा प्रेरणा आणि रेणुका ग्रुपच्या मंजू कल्पना स्वप्नाली तर गौरी ग्रुप च्या सविताताई ज्योतीताई मंजुषा विजया मीना उज्वला दीप्ती भावना, अंबा ग्रुपच्या स्नेहल निशा सोनल रेवती श्रद्धा वृषाली सुनिता कोमल विद्या योगिनी सीमा शुभांगी केतकी तर चंडिका ग्रुपच्या सपना याशिवाय दुर्गा ग्रुपच्या माधुरी वर्षा विशाखा शितल देवल अपेक्षा प्रिया श्वेता तर सप्तशृंगी ग्रूपच्या सुषमा ज्योती प्रगती वंदना दीपा विशाखा माया जया कविता प्रांजली शितल स्वप्नगंधा मनीषा अलका प्रगती तसेच तुळजाभवानी ग्रुपच्या सारिका नीताताई अश्विनी सुनीता वैशाली सिद्धी देशमुख रेवती पावडे चिमुकल्या आनंदीची शिवगर्जना याप्रकारे सहभाग होता.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी प्रत्येक मेंबर ला आकर्षक बक्षीस देण्यात आलेत.
कार्यक्रमाच बहारदार संचलन शुभांगी आणि संजीवनी देशमुख यांनी केलं. तर आभार RRC सिटी चॅनेल च्या संचालिका कल्पना देशमुख यांनी मानलेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यास मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणी तथा सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाची सांगता मंडळाच्या अध्यक्षा व हॉटेल सेंटर प्लाझा च्या संचालिका राजश्री देशमुख यांच्याकडून उपस्थित सर्व महिलांच्या स्नेहभोजनाने करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....