"माझ्या मतदार संघातील प्रशिकच्या व्यवस्थापिका सौ. आशा राऊत यांचा मला स्वाभिमान. - आमदार सईताई डहाके.
कारंजा : नुकतेच कारंजा येथील प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या दि. १४ एप्रिल २०२५ च्या महामानव डॉ. आंबेडकराच्या ५० x ५० फुट महाकाय रांगोळी प्रतिमेचे जागतिक स्तरावर नामांकन होऊन त्यांना विश्वविक्रमाचा वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार स्थानिक वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख आणि कारंजा मानोरा तालुक्याच्या आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड रविन्द्र रामटेके,उपाध्यक्ष आकाश कऱ्हे, संचालक साटोटे, व्यवस्थापिका सौ.आशा राऊत यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी झालेल्या वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार समारंभात व्यासपिठावरून बोलतांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख म्हणाले. "प्रशिकच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापिका सौ.आशा राऊत यांच्या अपार मेहनतीमुळे ही पतसंस्था उत्तुंग शिखरावर पोहचली असून आज रोजी त्याची नोंद जागतिक पातळीवर झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करीत असून, जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल तेव्हा मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची ग्वाही देत आहे." तसेच याप्रसंगी आपल्या संभाषणातून आमदार सईताई डहाके यांनी सांगीतले. " माझ्या मतदार संघातील कतृत्ववान महिलेने सौ.आशा राऊत यांनी प्रशिक पतसंस्था सांभाळतांना संस्थेचा भरपूर विकास केला. व आज रोजी एवढा मोठा जागतिक विक्रम केला याचा महिला म्हणून मला अभिमान असून मी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे." कारंजा तालुक्यातील प्रगतीच्या उंच शिखरावर असलेल्या एकमेव अशा प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजाद्वारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,तांदुळाद्वारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी प्रतिमा कलाकृती ५० x५० फुट आकाराची काढल्या गेली होती.ड्रोनद्वारे घेतलेल्या या प्रतिमेचे व्हिडीओ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फेसबुक ; व्हॉट्सॲप द्वारे गेले होते.दैनिक विश्वजगत, दैनिक विदर्भ कल्याण, साप्ताहिक करंजमहात्म्यसह बहुतांश वृत्तपत्राने त्याची दखल घेऊन भरभरून प्रसिद्धी दिली होती.शिवाय पतसंस्थेच्या हजारो ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर ह्या महामानवाच्या अप्रतिम रांगोळीचे स्टेटस् ठेवून त्यांना अभिवादन केले होते. त्यानिमित्ताने बुद्ध पोर्णिमेच्या पावन दिनी सोमवार दि. १२ मे २०२५ रोजी,सायंकाळी ०५:०० वाजता,स्थळ : महेश भवन कारंजा (लाड) येथे प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. रविन्द्र काशिनाथ रामटेके यांचे अध्यक्षतेखाली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा.संजयभाऊ देशमुख ; कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या आमदार मा.श्रीमती सईताई डहाके, माजी जि. प. अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे,भाजपा शहराध्यक्ष प्राजक्ता माहितकर,शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ तुरक,तालुकाप्रमुख विलास सुरडकर,शहर प्रमुख गणेश बाबरे,माजी जि.प.सदस्य आशिष दहातोंडे यांचे उपस्थितीत पतसंस्थेचा भव्य व दिव्य असा अवार्ड वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात सर्वप्रथम प्रमुख पाहुणे खासदार संजय देशमुख तथा आमदार सईताई डहाके व उपस्थितांचे हस्ते पतसंस्थेला वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पतसंस्थेच्या पारदर्शी व्यवहाराबद्दल आणि वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल व्यवस्थापिका सौ. आशा राऊत, वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त रांगोळी बद्दल आर्टिस्ट मनोज पातुरकर यांचा सत्कार करण्यात आला.शिवाय उत्कृष्ट वार्तापत्राबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे, अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी, जिल्हाध्यक्ष किरण क्षार, तालुकाध्यक्ष मोहमंद मुन्निवाले, शहर अध्यक्ष नितीन वाणी,प्रदिप वानखडे, एकनाथ पवार इत्यादी पत्रकार मंडळीना पतसंस्थेकडून भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.