कारंजा (लाड) : कलियुगातील देवमाणूस म्हणून ओळखल्या जाणारे,संपूर्ण महाराष्ट्रात विविध मंदिरे आणि यात्रोत्सवात असणारी बोकूड बळींची वाईट प्रथा आपल्या समाजप्रबोधनाने कायमची बंद पाडून,एक दोन नव्हे तर आजतागायत पर्यंत,लाखो बेजुबान व निष्पाप जीवांना (कोंबडं बोकडं वगैरे) जीवदान देणारे,हजारो व्यसनाधिनांना व्यसनमुक्त करणारे,जीवदया गोरक्षण संस्था लाठी येथील परमहंस संत दिलीप बाबा लाठी यांचा संपूर्ण महाराष्ट्रात गोतावळा व शिष्यमंडळी आहेत. परमहंस संत दिलीप बाबा लाठी हे आधुनिक गाडगेबाबा ह्या नावाने ओळखले जात असून, संत गाडगेबाबांच्या किर्तनशैलीतच प्रबोधन करीत असतात. अशा ह्या देवमाणूस संत दिलीप बाबा यांनी, गोंविदराव मुंदेकर यांच्या निवासस्थानी स्वेच्छेने येण्याची इच्छा प्रकट करून,बुधवार दिनांक. २६ मार्च २०२५ सायंकाळी ०४ : ०० वाजता कारंजा येथे बायपास किन्ही रोड स्थित गोविंदराव मुंदेकर यांच्या निवासस्थानी अकस्मात \'न भुतो न भविष्यती\' अशा प्रकारे भेट देवून त्यांच्या शिष्यमंडळींना सुखद धक्का दिला.यावेळी सर्वप्रथम गोविंदराव मुंदेकर व त्यांच्या परिवाराने संत दिलीप बाबा यांचे हारार्पण करून आपल्या निवासस्थानी सहर्ष स्वागत केले. त्यानंतर स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष आणि सेवाव्रती समाजसेवक संजय कडोळे, माजी सरपंच प्रदिप वानखडे, ओंकारआप्पा मलवळकर, कारंजा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ बगडे, गजाननराव चव्हाण आदींनी भगवी शाल,पुष्पहार देवून संत दिलीप बाबांचे पूजन करून दर्शन घेतले. संत दिलीप बाबा यांनी आपल्या शिष्यपरिवारातील संजय कडोळे व प्रदिप वानखडे आणि शिष्यमंडळीचे व्यसनमुक्ती आणि निःस्वार्थ सामाजिक कार्याची प्रशंसा करीत त्यांना भरभरून आशिर्वाद दिले.