वरोरा :- चंद्रपूर नागपूर महामार्गावर असलेल्या विश्रामगृहाजवळ दि. 18 ऑगस्ट रोजी रविवारला चार चाकी वाहनाने दुचाकी स्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दुपारी 12:00 वाजताच्या सुमारास घडली यात आसराम धाकड, वय 32 वर्ष हा गंभीर रित्या जखमी झाला. चार चाकी वाहन क्रमांक MH 31 CP 8878 हि विश्रामगृहाच्या मार्गावरून नागपूर - चंद्रपूर कडे वाहन वळन घेत असतांना दुचाकी क्रमांक RJ 34 SY 2032 चालक हा गंभीर रित्या जखमी झाल्याने त्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी चार चाकी वाहन चालकाचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली. वृत्त लिहेस्तव चार चाकी वाहनावर कोणत्याही प्रकारची कारवाही करण्यात आली नव्हती. विश्रामगृहाजवळ उपस्थित असंख्य नागरिकांनी चार चाकी वाहनांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.