कारंजा:- दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी निवडणुक निकाल कळताच कारंजा येथील जयस्तंभ चौकात भाजपा कारंजा तालुका व शहर भाजपाच्या वतीने भाजपाचा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला. जयस्तंभ चौकात उपास्थित भाजपा तालुका व शहर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे व भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी भाजपाचा जयघोष करीत नारे दिलेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शहर सरचिटणीस शशी वेळुकर यांनी केले होते. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.