पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत मौजा पटेलनगर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर, राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकड्यांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा सट्टापट्टीचा हारजीतचा जुगार खेळणाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश जप्त करण्यात येवून त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दि. १२/०५/२२ रोजी सायंकाळी ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, पटेलगनर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकडयांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा हारजीतचा जुगार खेळ खेळीत आहेत सदर ठिकाणी खाजगी वाहनाने वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापा टाकला असता नमुद आरोपी १) विकास विनायक उईके, वय ४२ वर्ष, रा.पटेलनगर ब्रम्हपुरी यांचेकडून नगदी २१७२ रू व ईतर साहीत्य कि.अं. ०५रू २) सोमेश्वर नारायण कुमरे, वय ४७ वर्ष, रा. पटेलनगर ब्रम्हपुरी याचेकडून १०८० रू व ईतर साहीत्य कि अॅ. ०५ रू सदर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले व दोन्ही ईसमांवर महाराष्ट जुगार प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही मा. श्री मल्लीकार्जुन इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मुल पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी ठाणेदार श्री रोशन यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि मोरेश्वर लाकडे, पोहवा नरेश रामटेके, पोअमं प्रमोद सावसाकडे, अजय नागोसे, प्रकाश चिकराम यांनी केली.