कारंजा : कारंजा तालुक्यातील सर्वाभिमुख लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले पप्पूसेठ उपाख्य नितीन भट यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा शहरातील तीन माजी नगराध्यक्ष एकत्र आले होते. शिवाय कारंजा शहरातील दिग्गज व्यक्तींनी सुद्धा हजेरी लावल्याचे दिसून आले. यावेळी ६२ व्या वाढदिवसानिमित्त, सत्कारमूर्ती पप्पूशेठ भट यांचे औक्षण करीत शाल पुष्पगुच्छ देऊन गोविंदराव मुंदेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, माजी नगराध्यक्ष विजय बगडे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे तसेच जि प सदस्य दत्ताभाऊ तुरक इ ची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय कृष्णा कृषी बाजार चे संचालक ललित चांडक, मेजर सुरेश माहुलकर,, प्रदिप गीरी, प्रकाश आगे, बोळे सर , रामभाऊ बोरकर,रूपचंद जाधव,पत्रकार समिर देशपांडे, खेर्डा काळीचे माजी सरपंच प्रदिप वानखडे, युनूस ठेकेदार, संजय लाठे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक व्यापारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे यांनी आदर्श जय भारत सामाजिक संस्थेच्या संगीतरजनीचे आयोजन केले होते. सदरहु संस्थांकडून सुद्धा शाल, श्रीफळ व श्री कामाक्षा मातेची प्रतिमा देवून, नितीन उपाख्य पप्पूसेठ भट यांचा सत्कार करण्यात आला. याविषयी बोलतांना माजी नगराध्यक्ष म्हणाले, "सर्वांशी मिळून मिसळून राहणारे सर्वाभिमुख हास्यमुख व्यक्तिमत्व म्हणजे पप्पूसेठ भट हे असून त्यांच्या सामाजिक कार्याला तोड नाही. त्यांचा वाढदिवस एवढया मोठ्या प्रमाणात होत असलेला पाहून आम्हाला आनंद होत आहे. त्यांना श्रीकृपेने अखंड दिर्घायुष्य लाभो ह्या आमच्या शुभेच्छा !" याप्रसंगी झालेल्या संगीत रजनीमध्ये डॉ ज्ञानेश्वर गरड, नंदकिशोर कव्हळकर, विजय राठोड, डॉ इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, हफिजखान, डॉ.आशिष सावजी, डॉ. स्नेहल राऊळ, विलास ठाकरे यांनी सदाबहार गीते सादर करून उपस्थित श्रोते रसिकांचे मनोरंजन केले. पप्पूसेठ भट यांचेकडून स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार गोविंदराव मुंदेकर, माजी सरपंच प्रदिप वानखडे यांनी केले .