पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती भाजपा ओबीसी मोर्चा ब्रम्हपुरी तालुका व शहर च्या वतीने मोठ्या उत्साहात भाजपा कार्यालय आरमोरी रोड ब्रम्हपुरी येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा अतुल देशकर होते.प्रमुख उपस्थिती भाजपा ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे,धनगर समाज मंडळ चे प्रमुख प्रकाश घोरुडे व डॉ शेळके होते .या प्रसंगी प्रा अतुल देशकर, प्रा प्रकाश बगमारे,प्रकाश घोरुडे यांनी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य कसे आजसुद्धा प्रेरणादायी आहे याची अनेक उदाहरणे दिली व आज सुद्धा किती गरज आहे हे सांगितले. या प्रसंगी नगरसेवक तथा गटनेता भाजपा न प ब्रम्हपुरी, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष प्रेमलाल धोटे,शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,माजी नगरसेवक मनोज भुपाल,भाजयुमो शहर महामंत्री स्वप्निल अलगदेवें,अशोकजी तूंडुलवार,मदन पाटील मैंद,घनश्याम बोधे,पुरुषोत्तम आसकर,रणधीर बोरकर, प्रमोद चिडे,नवघरे सर,सुरेश बनपूरकर उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन व उपस्थित सर्वांचे आभार मनोज वठे यांनी मानले.