कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे )
श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन संपन्न झाले.
हे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम पारवा (पोटी), तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 या दरम्यान संपन्न होणार आहे. या शिबिराच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गवई होते. उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. निलेश कडू उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विजय काळे, विजय बगडे, पारवा पोटी ग्रामपंचायतचे सरपंच श्री गोपाल भाऊ लुंगे, गावचे ग्रामसेवक संतोष काळे, गावातील पोलीस पाटील शंकरराव डाखोरे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष जानराव सावके, गावाचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर रोकडे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेवराव सावके भवानी माता संस्थेचे अध्यक्ष अरुण सावके तसेच ग्रामगीताचार्य दत्ता महाराज रोकडे, प्रा. लक्ष्मी तेलगोटे, प्रा. अलोलिका पारधी, प्रा. प्रियंका खडसे प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटनीय मनोगत व्यक्त करताना डॉ. निलेश कडू यांनी शिबिरात सहभागी स्वयंसेवकांना गाडगे बाबा यांचा आदर्श अंगी बाळगा असा उपदेश दिला. गावातील लोकांशी जुळवून घेऊन त्यांचे सहकार्य प्राप्त करून गावामध्ये दीर्घकालीन टिकणाऱ्या प्रकल्पावर काम करावे असे सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडण्यास मदत होते अश्या आशयाचे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष गवई यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून स्वतःच्या अंगी विनयशीलता, नम्रता बाळगावी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा, विनोबा भावे, महात्मा गांधी यांच्या विचारातील युवक बनण्यासाठी प्रयत्न करावे अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिरार्थी स्वयंसेवकांना केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश पोहोकार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. नितेश थोरात यांनी केले. आभार प्रा. पराग गावंडे यांनी केले.
या शिबिरात च्या उद्घाटनीय कार्यक्रमाला ७५ स्वयंसेवक तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज कदम, अश्वजीत इंगोले, करण कांबळे, शुभम शिंदे, गजानन नांदे, तेजल सावते, दिगंबर शिंदे, श्रीजीत काळे, संदेश सोनवणे, श्रेया सारसकर, सतीश काळे, निकिता पंडित, स्नेहल इंगोले, राधा ठाकरे, गीता दहातोंडे, वैष्णवी जाधव, गायत्री राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....