कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व सामान्य नागरिकांना प्रत्येक जिवनावश्यक आवश्यकते करीता, विजेवर अवलंबून राहावे लागत आहे. आज प्रत्येकाला विद्युत दिवे,ए सी,कुलर,फॅन,कॉम्प्युटर, स्वयंपाकगृहात महिलांना मिक्सर, चक्की इ.करीता विज अत्यावश्यक आहे. विज गुल असली तर प्रत्येकाला नाना संकटाचा मुकाबला करावा लागतो. लहान मुले, वयोवृध्द, रुग्नालयातील रुग्नांच्या विविध शस्त्रक्रिया, विविध यंत्रे ह्या सर्वच गोष्टी विजेवरच अवलंबून आहेत. परंतु काही दिवसां पासून कारंजा शहरात विजेचा लपंडाव सुरू झालेला आहे अचानक,ग्राहकांना काहीही सूचना न देताच अचानक विज पुरवठा खंडीत केल्या जात असून रात्री बेरात्री बत्ती गुल होत असल्याने , अचूक वेळेवर १००% विज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहक नागरीकांचे हाल होत आहेत. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष्य न करता , विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी कारंजेकर ग्राहकांकडून होत आहे .नुकताच पावसाळा सुरु झालेला आहे. त्यामुळे कोठे काही अडचण येत असल्यास विद्युत वितरण कंपनीने दुरुस्ती करून अखंडीत विज पुरवठा करावा अशी रास्त मागणी ग्राहकांकडून व्यक्त होत आहे .