कारंजा : कारंजा तालुक्यातील प्रगतीच्या उंच शिखरावर असलेल्या एकमेव अशा प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजा द्वारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,तांदुळाद्वारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी प्रतिमा कलाकृती ५० x५० फुट आकाराची काढल्या गेली होती.ड्रोनद्वारे घेतलेल्या या प्रतिमेचे व्हिडीओ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फेसबुक ; व्हॉट्सॲप द्वारे गेले होते.दैनिक विश्वजगत, दैनिक विदर्भ कल्याण, साप्ताहिक करंजमहात्म्य सह बहुतांश वृत्तपत्राने त्याची दखल घेऊन भरभरून प्रसिद्धी दिली होती.शिवाय पतसंस्थेच्या हजारो ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर ह्या महामानवाच्या अप्रतिम रांगोळीचे स्टेटस् ठेवून त्यांना अभिवादन केले होते. त्यानिमित्ताने बुद्ध पोर्णिमेच्या पावन दिनी सोमवार दि. १२ मे २०२५ रोजी,सायंकाळी ०५:०० वाजता,स्थळ : महेश भवन कारंजा (लाड) येथे प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. रविन्द्र काशिनाथ रामटेके यांचे अध्यक्षतेखाली, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा.संजयभाऊ देशमुख ; कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लाडक्या आमदार मा.श्रीमती सईताई डहाके,जिल्हाधिकारी मा. बुवनेश्वरी एस. यांचे विशेष उपस्थितीत तसेच मा. राजेंद्रजी घाटे अध्यक्ष : नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन नागपूर ; मा.कुणालजी झाल्टे, तहसिलदार कारंजा ; मा. महेश कछवे जिल्हा उपनिबंधक ; मा. प्रा. डॉ.आर.एम.पाटील विद्याभारती कॉलेज ; मा.प्रविण खंडारे,पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत पतसंस्थेचा भव्य व दिव्य असा अवार्ड वितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड रविन्द्र रामटेके, उपाध्यक्ष शरद कऱ्हे व संचालक मंडळ आणि व्यवस्थापिका सौ.आशाताई राऊत यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.