जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव भाकरे, अकोला. येथे नुकतीच सायबर सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील कु. चंचल निंबाळकर आणि कु. ईश्वरी मोकळकर या सायबर वॉरियर्स नी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे सायमन गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे याविषयी महत्वपूर्ण माहिती सांगितली. मोबाईलचा आधी वापर टाळावा सतत मोबाईल गेम्स खेळल्यामुळे कसे वाईट परिणाम होतात, फेक वेबसाईट च्या माध्यमातून कशी फसवणूक होते, आणि यापासून आपण कसे सुरक्षित रहावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा क्विक हिल फाउंडेशन यांच्या सहयोगाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एम. सर व समन्वयक डॉ. दीप्ती पेटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वनमाला चौके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शिक्षक व शिक्षिका बिळवे मॅडम व श्री. गोलाइत सर व शाळेचे सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.