मूल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवित असताना ठाणेदार सुमीत परतेकी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गांधी चौक येथे नाकाबंदी करून बुधवारच्या मध्यरात्री ३ वाजतानंतर आंध्रप्रदेश पासिंगच्या दोन ट्रकामधून तब्बल ५० जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी सदर जनावरांची सुटका करून जीवदान दिले. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर तिघे फरार झाले. या कारवाईत पोलिसांनी १६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ठाणेदार सुमीत परतेकी अवैध जनावरे वाहतुकीवर लक्ष ठेवून होते. बुधवारी रात्री आंध्रप्रदेश पासिंगच्या दोन ट्रकांमधून मोठ्या प्रमाणात
पाळीव जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती ठाणेदार परतेकीयांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह स्थानिक गांधी
चौकात नाकाबंदी करीत असताना ट्रक क्रमांक एपी-२९ टिबी - ३५१९ आणि ट्रक क्रमांक एपी २० वाय ९४५५ ची तपासणी केली. तेव्हा एका ट्रकमध्ये २४ बैल आणि दुसऱ्या ट्रकमध्ये २६ वैल असे एकूण ५० बैल कोवून निर्दयतेने असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक करीत
ट्रकांची तपासणी करीत असताना एका ट्रकचालकाने संधी साधून
पोबारा केला, तर गडचांदूर येथील प्रशांत बाळा जुमनाके (२८) हाट्रकचालक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ट्रकचालक प्रशांत जुमनाके याला ताब्यात घेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तालुक्यातील टेकाडी येथील रहिवासी मोहम्मद अली अजगर अली सैय्यद आणि त्याचा मुलगा किस्मत अली मोहम्मद अली सैय्यद यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन मूल येथे महाराष्ट्र प्राणी सुधारित अधिनियम १९७६ सहकलम, प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एसडीपीओ मल्लीकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुमीत परतेकी, एपीआय सतीश बनसोड, सहाय्यक फौजदार उत्तम कुमरे, पुंडलीक परचाके, सचिन सायंकार, सुनील घोडमारे, गजानन तुरेकर, स्वप्नील यांच्यासह केली. पुढील तपास सपोनि सतीश बनसोड करीत आहेत.