मुंबई --- मुंबईतील प्रथितयश कवयित्री सौ.सिमा झुंजारराव यांना पुण्यातील एका समारंभात प्रकाशातील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्याआधी बंधुतेचा 'काव्यप्रतिभा' आणि 'शब्दक्रांती' पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या होत्या. आत्ता १२ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे एस एम जोशी सभागृहात नुकताच त्यांना बंधुतेचा *प्रकाशगाथा* हा अतिशय सन्मानाच पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांनी बंधुतुल्य सन्माननिय प्रकाशदादा रोकडे आणि सुप्रसिद्ध कवी आदरणीय चंद्रकांत दादा वानखेडे यांचे आभार न मानता ऋणात राहणे पसंत केले आहे.
तसेच यापूर्वी देखील गुजरात राज्याचा "नवरत्न नारी सन्मान" सुद्धा त्यांना मिळालेला आहे 'कल्याण नागरिक तर्फे आदर्श नारी पुरस्कार' २०२४ मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे.
त्यांच्या 'खुल्या मनाच्या खिडक्या' या गझलसंग्रहास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट तीन पुरस्कार सलग मिळालेले आहेत
'जपते आहे अजून काही ' या काव्य संग्रहास चिपळूण येथे ,आणि विदर्भातील आर्वी येथील आतापावेतो दोन सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा मान देखील त्यांच्या पुस्तकास मिळालेला आहे
असेच त्यांना यश मिळत राहो ,त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन आणि कौतुकाचा सर्वच स्तरातून वर्षाव होत आहे.
सौ .सीमा झुंजारराव ह्या वृत्तातल्या कविता असोत किंवा लावणी अभंग मुक्तछंद सर्वत्र त्यांची लेखणी संचार करीत असते नवीन काही शिकण्याची त्यांची नेहमीच तळमळ दिसून येते. छंद म्हणून त्या कला सुद्धा जोपासतात संगीताच्या त्यांनी सहा परीक्षा दिल्या असून संगीत शिक्षण त्यांचे अजूनही चालू आहे. योग असु देत किंवा फॅन्सी ड्रेस काँपिटिशन असू देत सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यात सुद्धा त्यांनी पटकावलेले आहेत इनरव्हील क्लब कल्याण येथे
*2002 मध्ये त्यांनी मिसेस कल्याण*
ही काँपिटिशनसुद्धा जिंकलेली आहे.
समाजभान असलेली ही कवियित्री *कर्मयोगी शंकररराव झुंजारराव ह्यांची नातसून असून
कर्मयोगी बंधू यांच्यावर लिहिलेली त्यांची पुस्तिकेचे त्यावेळच्या कल्याण येथील महापौरांच्या हस्ते प्रकाशन झाले होते.
शंकरराव झुंजारराव ह्यांनी केलेले कार्य आता मोठया स्वरूपात आणि त्यांचा इतिहास , सर्वत्र महाराष्ट्राला ज्ञात होईल यासाठी त्यांचा अक्खा जीवनपटच पुस्तक रूपात लिहिण्याचा त्यांचा मानस आहे लवकरच त्याची सुरवात होणार आहे.