कारंजा (लाड) : "ब्र.कु.संजयभाई कडोळे हे ब्रम्हकुमारीज विश्व विद्यालयाच्या कारंजा केन्द्राशी केन्द्र स्थापने पासून,जवळ जवळ सदोतीस वर्षापासून जुळलेले असून ते ब्रम्हकुमारीज परिवाराचे 'बाबाचे सच्चे बच्चे' म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांनी दारिद्रयावस्थेत जीवन जगणे पसंत केले.मात्र पत्रकारिता करतांना आपल्या चारित्र्याला केव्हाही डाग लागू दिला नाही. गुन्हेगारी जगताच्या बातम्या किंवा अवैध व्यवसायाच्या माध्यमातून केव्हाही पत्रकारिता केलेली नाही.त्यांनी आपली पत्रकारीता केवळ मानवसेवा, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याकरीताच केलेली आहे."बाबाचे सच्चे बच्चे, सेवाव्रती व चारित्र्यवान पत्रकार म्हणून नेहमीच संजयभाई कडोळे यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. त्यामुळे ते ब्रम्हकुमारी परिवाराचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जातात." असे प्रतिपादन राजयोगीनी ब्र. कु. मालती दीदी यांनी केले. या बाबत अधिक वृत्त असे की,निव्वळ निःस्वार्थ मानवसेवेचे अहर्निश सेवाकार्य करणाऱ्या साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे विमोचन,करंजमहात्म्य परिवाराचे,ज्येष्ठ पत्रकार माजी प्राचार्य प्रा.अशोकराव उपाध्ये यांच्या आग्रहास्तव ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या केन्द्र संचालिका ब्र.कु.मालती दीदी यांनी केले त्यानंतर विश्व बंधुता दिनानिमित्त व्यक्त होत असतांना त्या बोलत होत्या.यावेळी प्रदिपभाई वानखडे, प्रा . अशोकराव उपाध्ये, डॉ निखिल भाई कटारीया, प्रविणभाई दिघडे, दिलीपभाई ताठे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी राजयोगीनी ब्र.कु.मालती दिदी यांनी त्यांच्या शुभ हस्ते साप्ताहिक करंजमहात्म्यचे विमोचन करून करंजमहात्म्यचा अंक परमपिता शिवबाबा यांना अर्पण केला.