कारंजा : कारंजानगरीत यापूर्वी विनोदी अभिनेते-दादा कोंडके, निळू फुले, विक्रम गोखले, रमेश भाटकर, माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल, जोत्स्ना जोशी व इतर अनेकवेळा शहरातील विविध कार्यक्रमा करीता येऊन गेले आहेत . मात्र आता, जैन धर्मियांची काशी असलेल्या पवित्रनगरीमध्ये, आयोजक, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यीक, लोककलावंत, पत्रकार, वारकरी, हभप संजय कडोळे यांनी आणि अ भा मराठी नाटय परिषद नियामक मंडळाचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हलकर यांनी तिन वर्षापासून अ भा नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष झाडीपट्टी रंगभूमीचे सुप्रसिद्ध अभिनेते नरेश गडेकर तथा स्व स्मिता पाटील पुरस्कारासह शेकडो पुरस्कारांनी गौरवांकित असलेल्या नामांकित अभिनेत्री आसावरी तिडके (गडेकर ) यांना स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेकडून, कारंजा भेटीचे निमंत्रण दिले होते. परंतु झाडीपट्टी रंगभूमिच्या लागोपाठ असलेल्या कार्यक्रमामुळे त्यांना शक्य होत नव्हते . नरेश गडेकर तथा आसावरी तिडके हे स्वतः धार्मिक-आध्यात्मिक-सांस्कृतिक प्रवृत्तीचे असल्यामुळे, जैन धर्मिय तिर्थक्षेत्र कारंजा विषयी सुद्धा त्यांना विशेष ओढ होती . त्यामुळे त्यांनी कारंजेकराचे आमंत्रण अखेर स्विकारले असून, शनिवार दि . 3 डिसेंबर 2022 रोजी कारंजा येथे होणाऱ्या, विदर्भ लोककलावंत संघटना, जय भवानी जय मल्हार गोंधळी नवरात्रोत्सव मंडळ, महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजा तथा मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद कारंजाच्या मेळाव्याकरीता विशेष अतिथी म्हणून येणार असून, त्यांच्या स्वागताकरीता कारंजा येथील, विदर्भ लोककलावंत संघटना तथा ईरो फिल्मस् म्युझिक एन्टरटेन्टमेन्ट कारंजा या चित्रपट कंपनीने तयारी केली आहे . तसेच त्यांच्या स्वागता करीता अ भा नाट्य परिषद कारंजा शाखेच्या अध्यक्षा सौ सुधाताई चवरे ,नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर , डॉ . इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, डॉ . ज्ञानेश्वर गरड, राहुल सावंत,संजय कडोळे, पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, अतुल धाकतोड, रविन्द्र नंदाने (गुरुजी), उमेश अनासाने विशेष परिश्रम घेत आहेत.