शहरातील नामदेव नगर येथील कल्याणकर परिवारातील काही सदस्य येलदरी येथे फिरण्यासाठी गेले असता सेनगाव हद्दीतील येलदरी जलशयात वडील व मुलगा पोहण्यासाठी उतरले होते. पण पोहता पोहता 14 वर्षीय मुलगा पाण्यात बुडल्याची घटना शनिवारी (दि. 6) सकाळी 11. 30 च्या सुमारास घडली. घटनास्थळी प्रशासन आणि ग्रामस्थांनी पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतला. मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागला नव्हता.शहरातील एकलव्य शाळा परिसरातील नामदेव नगर भागातील रहिवासी संजय कल्याणकार हे आपल्या कुटुंबा सोबत सेनगाव हद्दीतील येलदरी रस्त्यावरील वन विभागाच्या उद्यानात फिरण्यासाठी गेले होते. उन्हाचा पारा चढल्याने गार्डन च्या बाजूला असलेल्या येलदरी जलशयात वडील संजय कल्याणकार व मुलगा मोहन (मोण्या) कल्याणकर (वय 14 वर्ष) हे दोघं पाण्यात पोहत होते. दरम्यान मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो जलाशयात बुडून बेपत्ता झाला. ही माहिती जिंतूर व सेनगाव पोलिसांना मिळताच पोलीस व प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 11. 30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे कार्य सुरूच होते. येलदरी जलशयात प्रचंड पाणीसाठा असल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत बेपत्ता मुलाचा शोध लागला नव्हता.