वाशिम : वृद्धापकाळी जगण्याचा आर्थिक आधार असणाऱ्या, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेचे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे,निव्वळ मानधनावर अवलंबून असणाऱ्या, तळागाळातील गोरगरीब वयोवृद्ध व दुर्धर आजारग्रस्त कलाकाराची परवड होत होती.त्यामुळे या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वी,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी,जिल्हाधिकारी महोदया वाशीम आणि जिल्हा परिषद समाज कल्याण वाशिम कार्यालयामार्फत,सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे गेल्या दोन महिन्याचे वृद्ध कलाकार मानधन पाठविण्याची मागणी केली होती. या संदर्भात जिल्ह्यातील पत्रकार रिसोडचे गजाननराव बानोरे, काशीनाथ कोकाटे,करंजीचे गणेशराव लहाने,कारंजाचे एकनाथ पवार,महादेवराव तायडे आदींनी सुद्धा आपल्या वृत्तपत्रामधून वाचा फोडली होती. त्यामुळे अखेर वृद्ध कलावंताच्या मागणीला यश मिळून, सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे,गुरुवार दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी डिबीटी द्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोककलावंताच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन टाकण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यातील कलावंताना मोठा दिलासा मिळाला.त्याबद्दल जिल्ह्यातील लोककलावंत लोमेश पाटील चौधरी,गजाननराव घुबडे मानोरा ; शेषराव मेश्राम,शाहीर खडसे वाशिम ; लक्ष्मणराव इंगळे,विश्वनाथ इंगोले मंगरूळपिर,प्रदिप वानखडे, अजाबराव ढळे,दिगंबरपंत महाजन,गुलाब पापळे,राजाभाऊ डाखोरे,राजेन्द्र डाखोरे,रामबकस डेंडूळे,शिवमंगल आप्पा राऊत, कारंजा ; राजाराम पाटील राऊत, लक्ष्मणराव इंगळे,सुधाताई डाके मंगरुळपिर,प्रकाश गवळीकर,राजु खंडारे,तुळसाबाई चौधरी,मानोरा ; शोभाबाई मापारी,इंदिराबाई मात्रे, कारंजा ;आदींनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक,सहसंचालक व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले असून,उर्वरीत माहे ऑगष्टचा लाभ लवकर मिळावा.अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....