जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर वाघाचा मुक्त संचार पाहायला काल दिनांक 6-7-2022 ला मिळालाय. या हायवेवरील तुमडी मेंढा जवळ वाघाने काल संध्याकाळी रस्ता क्रॉस केला. वाघ दिसताच या मार्गाने जाणारे वाहनधारक थांबलेत. परिणामी काही वेळासाठी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघांचा वावर असल्याची चर्चा आहे.
मात्र काल संध्याकाळी वाघाने हायवे क्रॉस केल्याने या भागात वाघांचा वावर असल्याची पुष्टी झाली. हा मार्ग चौपदरी असल्याने वाहनं अतिशय वेगाने जातात. या भागात वाघांचा वावर असल्याने वाघ किंवा वाहनचालकांच्या जिवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या वाघोबाचा दर्शनाने या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकात दहशत पसरली आहे.