स्थानिक आरमोरी येथे १ ऑक्टोला "एक तारीख एक तास" या उपक्रम अंतर्गत विद्यालयाची व परिसराची स्वच्छता करून २ ऑक्टोला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
जयंती निमित्ताने महात्मा गांधी व लालहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रम साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्क्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले,प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक बहेकर, हितकारिनी कला महाविदयालयाचे प्राचार्या सौ निखारे व विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य फुलझेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की आज आधुनिक काळात जगताना महान क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी यांचे विचार त्या सोबत सत्य,अहिंसा,प्रेम या गुण्णाचा अंगीकार करून देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक व देशांतर्गत शेतकरी जगतील तरच देश सुरक्षित व अर्थव्यवस्थेत सक्षम राहील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बुद्धे,आभार प्राध्यापक मेश्राम यांनी केला.