सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन काडातील वर्णव्यवस्था व जातिव्यवस्थेच जोखडातूंन मुक्त करून पशुतूल्य जीवन व्यतीत करने आपला धर्म मानून आपले जीवन व्यतीत करनारे समाज मन त्यांची चेतना जागृत करून ,शिक्षणाची मुहूर्तमेढ रोउन त्यांचा आत्मविश्वास वाढिस लाऊंन समाजाला प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे असे मौलिक विचार डॉ पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महवियालय ब्रम्हपुरी येथे आयोजित सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमात संस्था संस्थापक अध्यक्ष प्रा प्रकाशजी बगमारे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित महाविद्यालय प्राचार्या शारदा ताई ठाकरे ,प्रा सुभासचंद्र खोब्रागडे,प्रा कु हेमलता बगमारे व काही विद्यार्थिनी यांनी सुद्धा सावित्रीबाई यांच्या जीवनातील विविध प्रकारचे दाखले देत मार्गदर्शन केले व सर्वांनी सावित्रीबाई यांच्या एकतरी गुण अंगिकार करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी कार्य करावे अशी अपेक्षा केली.
सावित्रीबाई आणि ज्योतीबा फुले यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये बुडालेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी प्रेरित केले व शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य अविरतपणे केले व त्यांचे हे कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्य महाविद्यालयीन विद्यर्थ्यांनी केले यामुळे खऱ्या अर्थाने बालिका दिन साजरा करण्यात आला.