वाशिम : वृद्धापकाळी निराधार लोककलावंताना जगण्याचा आर्थिक आधार देणाऱ्या,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेचे मानधन शासनाने,दरमहा नियमीत वेळेवर देण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष, संत गाडगेबाबा स्वच्छतादूत राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त जनसेवक संजय कडोळे यांनी सांस्कृतिक मंत्री ना.सुधिर मुनगुंटीवार, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे केलेली होती.आणि गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे,निव्वळ मानधनावर अवलंबून असणाऱ्या, तळागाळातील गोरगरीब वयोवृद्ध व दुर्धर आजारग्रस्त कलाकाराची परवड होत असल्याचे शासनाच्या निदर्शनी आणून दिले होते.तसेच या संदर्भात या संदर्भात वृत्तपत्रांना सुद्धा वेळोवेळी बातम्या देवून दाद मागीतली होती. संजय कडोळे यांच्या,वृद्ध कलाकार योजनेच्या मानधनाच्या बातम्याची जिल्ह्यातील पत्रकार रिसोडचे गजाननराव बानोरे, नंदकिशोर वैद्य, संदिप पिंपळकर, काशीनाथ कोकाटे,करंजीचे गणेशराव लहाने,कारंजाचे एकनाथ पवार,महादेवराव तायडे आदींनी दखल घेऊन,आपल्या वृत्तपत्रामधून लोककलावंता वरील अन्यायाला वाचा फोडली होती.त्यामुळे अखेर शासन स्तरावर दखल घेण्यात आली.विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वृद्ध कलाकार मानधनाच्या मागणीला यश मिळून, त्यानुसार गुरुवार दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी डिबीटीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लोककलावंताच्या बँक खात्यात जुलै महिन्याचे प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन टाकण्यात आले होते.तर मंगळवार दि.10 सप्टेंबर 2024 रोजी माहे ऑगस्ट 2024 चे मानधन देखील डीबीटी ( थेट हस्तांतरण ) द्वारे कलावंताच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले असून,पुढील ऑक्टोंबर महिन्यात दि.15 ऑक्टोंबर 2024 पूर्वी सप्टेंबर 2024 चे मानधन जमा करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कलावंताना मोठा दिलासा मिळाला.याबद्दल जिल्ह्यातील विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, उपाध्यक्ष लोमेश चौधरी, लोककलावंत शेषराव मेश्राम,शाहीर खडसे,लक्ष्मणराव इंगळे, इंदिराबाई मात्रे, अजाबराव ढळे, राजाराम पाटील राऊत आदींनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.