वाशिम : केन्द्र शासन करोडो रुपयाच्या जाहिरातीमध्ये जनतेच्या पैशाची धुळधानी करून आणि मोठा गाजावाजा करून, तळागाळातील गोरगरीबाकरीता सवलतीच्या केवळ योजना जाहिर करते.परंतु प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ खऱ्याखुऱ्या गरजू गोरगरीब,निराधार, दिव्यांगाना मुळात मिळूच देत नाही.ही सत्य असलेली वस्तुस्थिती आहे.याबाबत हकीकत अशी की,एका व्यक्तीला एका महिन्याला उदरनिर्वाहा करीता अंदाजे वीस ते पंचवीस किलो धान्याची गरज असते. सध्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शासनाने स्वस्त धान्य दुकानामार्फत गोरगरीबाकरीता मोफत धान्य योजना आणलेली आहे.परंतु प्रत्यक्षात शासन प्रत्येक रेशन कार्डावर,केवळ दोन किलो गहू आणि आठ किलो तांदुळ देवून त्यांची बोळवण करीत आहे.तसेच उल्लेखनिय म्हणजे अनेक अंत्योदय लाभार्थी दिव्यांग आणि निराधारांच्या कुटुंबात केवळ एक किंवा दोन व्यक्तीच आहेत.अशा कुटुंबातील व्यक्ती रोजगार मिळविण्यास असमर्थ असल्या कारणाने आजतागायत त्यांचा उदरनिर्वाह स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डवर मिळणाऱ्या 35 (पस्तिस) किलो धान्यावर सुरु होता.परंतु आता शासनाने कुटुंबात एक किंवा दोनच व्यक्ती असणाऱ्या अशा अनेक कुटुंबाचे अंत्योदयचे धान्य अचानकपणे बंद करून, अवाढव्य महागाईच्या काळात त्यांना चांगलाच झटका दिला असल्याचे मत दिघी येथील अजाबराव ढळे ; सोमठाना येथील -दोन मुले,सुन,नातवंडे एका गॅस दुर्घटनेत मृत्यु पावल्याने पूर्णतः निराधार झालेल्या वयोवृद्ध मधुकर पाटील गावंडे तसेच तुळजापूर येथील विधवा महिलेची दिव्यांग मुलगी कु. ज्योती रमेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांचेशी बोलतांना सांगितले आहे.शासनाने गरजू अंत्योदय लाभार्थ्याचे धान्य बंद केल्याने खऱ्याखुऱ्या गरजू व्यक्तींना प्रचंड मनस्ताप होत आहे.एकप्रकारे त्यांच्या समोर वाढलेले अन्नाचे ताटच शासनाने हिरावून घेतल्यामुळे मलगाईच्या काळात त्यांची उपासमार होत असून त्यांचेकडून शासनाप्रती तिव्र असंतोष व्यक्त होत आहे.त्यामुळे कारंजाचे तहसिलदार कुणालजी झाल्टे साहेब यांनी या प्रकरणामध्ये लक्ष्य घालून,खऱ्याखुऱ्या गरजू अंत्योदय लाभार्थ्याचे हक्काचे धान्य त्यांना पूर्ववत सुरु करावे. अशी मागणी दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.