कारंजा: दिनांक 10सप्टेंबर 2023 रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब त्यांनी मंजूर केलेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम जैन प्रकोष्ठ चे पदाधिकारी तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे चिरंजीव ज्ञायकभाऊ पाटणी यांच्या शुभ हस्ते कारंजा तालुक्यातील गंगापुर, रामनगर , सोमठाणा, दिघी, बाजार, वहीतखेड, जांब या गावात विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचा विकासाकरिता आमदार साहेब भरपूर प्रमाणात निधी आणत असुन मतदार संघाचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. शेतकऱ्यांकरिता एक रुपयात पिक विमा काढण्यात आला.शासनाच्या योजना राबल्या जात आहे .ओबीसी यांना घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .मतदारसंघात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मतदारसंघातील बॉरेजेसला मंजुरात मिळण्याचे प्रयत्न सुरू आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी बंजारा बहुल क्षेत्रात निधी उपलब्ध करून दिल्या जात आहे .मतदारसंघातील पोहरादेवी क्षेत्रात विकास होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विदर्भाचा विकास होत आहे. या भागाकरीता निधि मिळत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा कारंजा तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे होते. या कार्यक्रमात उपाध्यक्ष अनिल कानकिरड, भाजप व उपाध्यक्ष राजीव भेंडे, उपाध्यक्ष रामकिसन चव्हाण,भाजपा उपाध्यक्ष राजू गाढवे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंगेश धाने, भाजपा सरचिटणीस संकेत नाखले, राजूभाऊ घोडे, स्वीय सहाय्यक संजय भेंडे , स्वप्नील चौधरी,भाजपा पदाधिकारी व गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.तालुक्यातील गंगापूर येथे 2515 1238 अंतर्गत बजरंगबली मंदीर परिसरात सभामंडप बांधकाम करणेअंदाजित किंमत 10 लक्ष रुपये कामाच भूमिपूजन झाले. यावेळी सर्वश्री दारासिंग चव्हाण ,किशोर चव्हाण, राजेश राठोड ,हिंमत चव्हाण इत्यादिसह गावातील नागरिक उपस्थित होते.रामनगर येथे 2515 अंतर्गत प्रभु पवार ते प्रकाश जाधव यांच्या घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता अंदाजित किंमत 10 लक्ष रूपये या कामाचे भूमिपूजन झाले .सुलभाताई दिलिप चव्हाण, मेरीचंद राठोड गुरूजी,सूर्यकांत जाधव, संजय चव्हाण, चंद्रकांत जाधव , अमरसिंग राठोड, छगन राठोड, मनोहर पवार, मिलचंद राठोड, रामराव चव्हाण ,माजी सर सरपंच प्रकाश जाधव, गंगाराम जाधव , जगदीश राठोड, चंद्रकांत जाधव , अमोल राठोड, भारत आडे, बाबुसिंग जाधव, स्वप्नील चौधरी इत्यादिसह गावातील नागरिक उपस्थित होते.सोमठाणा हनुमान मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करणे अंदाजे किंमत 10 लक्ष रुपये (आमदार निधीतील प्रस्तावित काम) या कामाचे भूमिपूजन झाले. रुपाली कोळकर उपसरपंच, भाजपा बूथ प्रमुख नीलेश राऊत, देवराव पाटिल ठाकरे, रमेश राउत, उमेश ठाकरे, विजु कोळकर, ज्ञानेश्वर नाखले, लक्ष्मण राउत, गजानन नाखले, विजय जमाले, अजय ठाकरे, हनुमान वाकोडे, साहेबराव वाकोडे, महेश नाकाडे, गोपाल राउत, धनंजय ठाकरे, अशोक ठाकरे, जनार्धन भगत इत्यादिसह गावातील नागरिक उपस्थित होते .दिघी येथे 2515 1238 अंतर्गत हनुमान -महादेव मंदीर परिसरात सभामंडप बांधकाम करणेअंदाजित किंमत 15 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन झाले. सरपंच दर्शना ढळे, रामेश्र्वर बाकल, सुरेश पाटिल बाकल, ज्ञानेश्र्वर पाटिल वानखडे, बबन पाटिल बाकल , शरद पाटील बकाल, बाबुराव बाकल, दिलिप गावंडे इत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते.उंबर्डा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत येथे दलित वस्ती मध्ये भवानी माता मंदिर ते मेसका माय पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, भवानी माता मंदिर ते बौद्ध विहार पर्यंत रस्ता बांधकाम करणे अंदाजीत किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन,2515 अंतर्गत दिगांबर काळेकर ते राजू घोडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत 10लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन झाले.उंबर्डा बाजार सरपंच सर्वश्री राज चौधरी ,चंद्रकांत चिरडे, राजूभाऊ गाढवे, राजूभाऊ घोडे , प्रशांत चौधरी,भारत कानडे, प्रफुल श्रीराव,मन्नान कुरेशी, मारुती बावणे, अरुण भाऊ, इंगोले भाऊ, दुर्गा ताई घोडे,दिगंबर भाऊ वर ,संघपाल नाईक, डॉक्टर इंगोले ,दादाराव इंगोले ,सुनील भाऊ इंगोले, रामदास नागोलकर, अविनाश ढळे, दुर्गाताई घोडे, भास्करराव इंगोले इत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते.
वहीतखेड येथे 2515 1238 अंतर्गत हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन झाले.सरपंच प्रभाताई सोनवणे , प्रकाश वामनराव वैद्य भाजपा बूथ प्रमुख नीलेश वैद्य,राजू वैद्य, बबनराव वैद्य, ज्ञानेश्वर वैद्य, पांडुरंग वैद्य,विठ्ठल वैद्य ,निरंजन वानखडे, मनीष वानखडे, नथू कामन वाले, रोशन लालू वाले कासम लालू वाले, रमेश वैद्य ,अमर वानखडे ,विवेक वानखडे , मिर्झा सर इत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते. जांब येथे
अल्प संख्यांक बहुल क्षेत्रात मुलभूत सुविधा पुरविने जांब ता. कारंजा जिल्हा वाशिम येथे सामाजिक सभागृह तयार करणे अंदाजित किंमत 20 लक्ष रूपये या कामाचे भूमिपूजन इत्यादि गावात भूमिपूजन संपन्न झाले.सब्बिर दलियाखाऊ, ऋषीकेश महल्ले,निरंजन वानखडे,मनीष वानखडे, विवेक वानखडे,शाम चौधरी, रोषण लालूवाले, नथू कामनवाले,लालू लालूवाले,अक्षय इंगळे, भारत साठे. नीलेश वैद्य इत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते. वरील सर्व गावात व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच कामाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....