कारंजा(लाड): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोलाच्या, कामगार कल्याण केंद्र कारंजाच्या वतीन तिन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेचे आयोजन,स्थानिक गुरुमंदिर संस्थानच्या प्रशस्त सभागृहात आयोजित करण्यात आले होते.सदर वासंतिक व्याख्यानमाला ही दि. १९ मे २०२५ ते दि. २१ मे २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पहिले पुष्प १ व्याख्याते प्रा.देवदत्त दामोदर पाठक गुरुकूल गुफान नाट्यसंस्था पुणे यांनी बाल रंगभूमी या विषयावर मार्गदर्शन गुंफले. यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे अशोक लाहे, पाणी पुरवठा योजना कारंजा हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण केन्द्र कारंजाचे केन्द्र प्रमुख प्रेमकांत राऊत यांनी केले.
दुसरे पुष्प व्याख्याते प्रा वॄषभ जवके सर (संचालक ध्येयनिष्ठ अभ्यासिका कारंजा) यांनी "स्वामी विवेकानंद व आजचा युवक" या विषयावर गुंफले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य परिवहन महामंडळ,बस आगाराचे व्यवस्थापक रविन्द्र मोरे होते तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अ.भा. मराठी नाट्य परिषद कारंजा शाखेच्या माजी अध्यक्षा सौ. सुधाताई चवरे उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण केंद्र कारंजाचे केंद्रप्रमुख प्रेमकांत राऊत यांनी केले. तर आभार सौ. वैशाली ताई ठाकरे यांनी मानले.
तिसरे पुष्प गुंफतांना व्याख्यात्य अंकुर साहित्य संघ अध्यक्षा आणि सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यीका,कवयीत्री ॲड.सौ. मंगलाताई नागरे यांनी "महिला कामगारांची सांस्कृतिक चळवळ" या विषयावर योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या पाहुण्या म्हणून धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई दसरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी सौ. वैशालीताई नवघरे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पि.पी.घोडचर केंद्र प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार केन्द्रप्रमुख प्रेमकांत राऊत यांनी मानले. एकंदरीत कार्यक्रमाला कारंजेकर रसिक श्रोत्यांनी चांगलीच दाद दिल्यामुळे, कामगार कल्याण केंद्रांची "वासंतिक व्याख्यानमाला" कारंजेकरांना साहित्यरूपी अमृताचा ठेवा देवून गेल्याचे उद्गार ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी बोलून दाखविले.