आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस महिलांच्या योगदानाला आणि समाजातील त्यांच्या कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन केवळ एका दिवसासाठी घेतल्याने महिलांची स्थिती सुधारणार नाही, त्यांचा विकास होणार नाही, त्यांचा आदर करणे आवश्यक आहे. पुरुषांनो तुमच्या बाजूने महिलांसाठी काही पावले उचला. केवळ 8 मार्चलाच नाही तर प्रत्येक दिवशी महिलांचा आदर करा, तरच खऱ्या अर्थाने समाजात महिलांना योग्य स्थान दिले जात आहे हे समजू. आपल्या घरातून आपल्या माता-भगिनींना आदर आणि आपुलकी द्या. महिलांना पुरुषप्रधान समाजाच्या साखळदंडात जखडून ठेवू नका, त्यांनाही स्वतःचे अस्तित्व आहे. असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी व्यक्त केले. स्थानिक फुलेनगर, ब्रम्हपुरी येथे महिला दिन उत्सव समिती यांच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस "जागतिक महिला दिन " म्हणून जगात साजरा केला जातो. त्यांचेच औचित्य साधून ब्रम्हपुरी शहरातील फुलेनगर येथील महिला भगिनींच्या सौजन्याने १४ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित *कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर उपस्थित होते.* तर सहउद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी येथील सी.एम.आर.पी. व्यवस्थापक विद्याताई लोखंडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न. प. ब्रम्हपुरी नगरसेविका अंजलीताई उरकुडे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मनोज भूपाल माजी नगरसेवक न. प. ब्रम्हपुरी, उमेश धोटे सरपंच चौगान, सुरज मेश्राम सामजिक कार्यकर्ता, डी. के. मेश्राम दलित मित्र फुलेनगर, वकार खान सामजिक कार्यकर्ता, कुंदाताई कोहपरे अध्यक्ष जय बजरंग वस्तीस्थान संघ पेठवार्ड उपस्थीत होते.
या जागतिक महिला दिन कार्यक्रमात फुलेनगर, ब्रम्हपुरी येथील महिला हिरहिरीने सहभागी झाल्या. जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन उत्सव समिती फुलेनगर, ब्रम्हपुरी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.