कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)अखिल भारतीय मराठा महासंघाची दिनांक 9 जुलै 2023 रोजी राजश्री शाहू सभागृह,शिवाजी मंदिर ,दादर मुंबई येथे केंद्रीय कार्यकारिणीची सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपसिंह जी जगताप यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा कारंजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, माननिय गुलाबरावजी गावंडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली.
याप्रसंगी त्यांनी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कार्य वाढविण्याचा मानस व्यक्त केला. सभेला उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे, कोषाध्यक्ष श्रीरंग बर्गे, कार्यालयीन चिटणीस वीरेंद्र पवार,युवक कार्याध्यक्ष परशुराम कासोळे आदी केंद्रीय पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.विदर्भातून अकोला जिल्ह्यातून विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे, अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे, मार्गदर्शक के एम देशमुख, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत होणे नागपूर, नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप धंदरे, नागपूर महानगर अध्यक्ष तेजसिंग मोरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष निनाजी पाटील, विदर्भ संघटक सुभाष झांबड, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष ज्ञानदेव पाटील आदी ,पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सभे मध्ये दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर होणाऱ्या एक दिवशी धरणे आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येऊन नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिनांक 25 जुलै रोजी दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.