वाशिम : विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा ही संस्था गेल्या कित्येक वर्षापासून वाढत्या महागाईचा आणि कोव्हिड 19 कोरोना महामारी काळा पासून लोककलेचे कार्यक्रम बंद पडल्यामुळे "वृद्ध साहित्यीक कलाकारांना दरमहा मिळणाऱ्या मानधनात शासनाने वाढ करावी." ह्या मागणी करीता आग्रही असून,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यसंमेलनातून बोलतांना काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी, "वृद्ध नाट्य व लोककलावंताना मानधन वाढीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे सुचोवात केलेले होते." तसेच मागील पंधरवाड्यात,मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथील सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध कला पुरस्काराचे वितरण करतांना, सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी सुद्धा "पुढील आठवड्यात वृद्ध कलाकारांच्या अनुदानात वाढ करणार." असे कलावंताना आश्वासन दिलेले होते. परंतु राज्यभरातील कलावंता कडून वेळोवेळी आग्रही मागणी होत असतांनाही अद्याप पर्यंत शासनाने निर्णय घेतला नसल्याचेच दिसून येत आहे.उल्लेखनिय म्हणजे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात गेल्या महिन्यात मानधनवाढ व इतर मागण्यांकरीता, दि 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाभरातील लोककलावंतानी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे विराट असे "क्रांतिकारी धरणे आंदोलन" करून आपल्या मागण्या रेटून धरल्या होत्या. त्या अनुषंगाने आज रविवार दि 25 फेब्रुवारी 2024 रोजी कोंडोली ता.मानोरा येथील जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक,कवी तथा नाट्य कलावंत आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे मानोरा शाखेचे कार्यकर्ते गजाननराव घुबडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांचे अव्वल सचिव . अमोलभाऊ पाटणकर यांची भेट घेऊन त्यांना "वाढत्या महागाई व बेरोजगारीमुळे कलावंताची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याची जाण करून देत विदर्भ लोककलावंतांच्या मागण्या उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस यांचे मार्फत,येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पूर्ण करून घेण्याची गळ घातली." त्यावर अमोलभाऊ पाटणकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.असे वृत्त कोंडोली येथील गजाननराव घुबडे,सागर कोटलवार यांनी कळवीले आहे.