कारजा-येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात शिक्षक दिना निमित्य 6 सप्टेंबर रोजी स्वयंशासन उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात राबविन्यात आला.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने स्वयंशासन उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
स्वयंशासन उपक्रमा मधे संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यानी शाळा सांभाळली.त्यामधे मुख्याध्यापकाची भूमिका वंश हिंमत आडोळे,क्लार्कची कु.स्नेहा राजू तायडे, प्रयोग शाळा परिचराची वेदांत पारे,शिपायाची पवन वडेकर, कार्तिक वडेकर,संस्कार करडे तर इयत्ता 8 वीच्या विषय शिक्षकांची भूमिका कु. वेदिका कदम, हर्षा सराफ, पायल मडामे, स्नेहल वासे,आदित्य इंगळे,तन्मय रिठे, अजिंक्य चव्हाण, इयत्ता 9 वीच्या विषय शिक्षकांची भूमिका कु. पायल ठाकरे, स्वरा पारे,प्रकृती मानवटकर, कल्याणी दिहाडे, दर्शना डुकरे, शिवानी एकनार,अमन वासे,ओम कोपरकार तर इयत्ता 10 वीच्या विषय शिक्षकांची भूमिका दक्ष दिहाडे, भावेश येवले, आयुष मांगे,सोहम कदम, कु. स्नेहा तायडे, शिवानी एकनार, श्रावणी लांजेवार, श्रुती मडामे आदिनी पार पाडली.
समरोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक राजेश शेंडेकर, शालिनी ओलिवकर, गोपाल काकड, अनिल हजारे, स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापक कु.वंश आडोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तविक अनिल हजारे यांनी केले. उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर प्रकृती मानवटकर,दर्शना डुकरे, शिवानी करडे, वेद बोनके, सोहम कदम, वंश आडोळे, श्रुती मडामे,श्रावणी लांजेवार, शिवानी एकनार,पायल मडामे आदि विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे अनुभव कथन केलेत. अध्यक्षिय भाषणात मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशासन दिनाचे महत्व पटवून दिले आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
समारोपीय कार्यक्रमाचे संचलन कु. प्रगती ठाकरे व भाविका लोडम यांनी केले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म. व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....