मुख्य निवडणूक आयोगाच्या उद्या दि 16 मार्च 2024 रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार असून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे म्हणून लोकसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 चा अनुसंघाने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील दैनिक, साप्ताहिकाचे संपादक, पत्रकार यांची निवडणूक निर्णय अधिकारी यांचा अध्यक्ष खाली समन्वय सभा कारंजा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यंदाचा निवडणुकीत काही बदल करण्यात आले असून जेष्ठ नागरिक म्हणजे 85 वर्षा पेक्षा जास्त वयाचे लोकांसाठी व दिव्यांग बांधवा साठी पोस्टल मतदानाची सुविधा करण्यात आली व तसेच याच म्हणजे जेष्ठ आणि दिव्यांग लोकांना मतदान केंद्रावर जाउन मतदान करायचे असेल तर संमती पत्र लिहून घेणार आहे या करिता बिएलओ प्रत्येक सर्कल मध्ये जाऊंन सर्वें करत असून संपूर्ण यादी तयार करण्यासाठी बूथ अवरनेस ग्रुप ची टीम तयार करण्यात आल्या ची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली. या वेळी मतदानचा टक्केवारी वाढविन्यासाठी महिलाना प्रोस्ताहित करण्यात येत आहे.कारंजा मनोरा मतदार संघात एकूण 303581मतदार असून पुरुष 157489 मतदार आहेत तर महिला मतदार 146083 इतकी संख्या आहे .एकूण 353 मतदान केंद्रा वर सध्यातरी 1240 कर्मचारी तैनात राहणार आहे दोन दिवसात ट्रेनिग होनार आहे अशी माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी पत्रकाराना दिली या वेळी मानोरा येथील तहसीलदार संतोष येवले, कारंजा तहसीलचे नायब तहसीलदार यांचेसह पत्रकार बांधव हजर होते.