दिनांक १२ जानेवारी ला अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने भाऊसाहेब लहाने सभागृहात पितामह सुधाकरराव जकाते यांचे अध्यक्षतेखाली जगाला ज्ञानाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुधाकरराव जकाते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या शहरात १२ शाखा काढण्यासाठी प्रयत्न करून सभासद बनविण्यासाठी अध्यक्ष, संघटन मंत्री यांनी प्रयत्न करावे असे आवाहन करून अध्यक्ष व संघटन मंत्री यांच्याकडून शब्द घेतला.
मनोहर गंगाखेडकर यांच्या पत्नी स्व.सुचिता गंगाखेडकर व स्व . भैय्यासाहेब मामू यांना दोन मिनिट मौन राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविकात संघटन मंत्री दिनेश पांडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.भास्कर राव कळाशीकर ग्राहक पंचायत चे सेवाभावी वृत्तीने काम केले तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. डॉ.अशोक ओळंबे यांनी काहिही सुचना न देता टोईंग पथके गाड्या उचलतात त्यामुळे गाडी चोरीला गेली की टोइंग पथकाने नेली हे कळत नाही., अतिक्रमण, स्वच्छतागृहांची शहरात आवश्यकता आहे या बाबतीत प्रयत्न करणे गरजेचे आहे असे डॉ अशोक ओळंबे म्हणाले. अध्यक्ष मनजीत देशमुख व. दिनेश पांडे यांनी शपथ पूर्वक संघ स्थापन करू असे म्हणाले.कार्यक्रमाला सचिव प्रमोद बोरकर,विनोद मेहरे, सुनील बाळापूरे, विनोद जकाते, संजय देशमुख, व्ही व्ही देशपांडे, गुरुदेव आदी कार्यकर्ते हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बाहाकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद यादवडकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. असे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर कळवितात.